लोकांच्या टोमण्यांना वैतागून बापाने मुलाचा जीव घेतला

Fed up with people's taunts, a father took his son's life

बेळगाव : विजयपूर जिल्ह्यातील नागठाण गावात एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. ‘मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही’ असे टोमणे गावातील लोकांनी वारंवार मारल्यामुळे जन्मदात्या बापानेच आपल्या सहा वर्षाच्या मुलाला कृष्णा नदीत बुडवून मारल्याची घटना तब्बल एक महिन्याने उघडकीस आली आहे.

                   सिद्धार्थ मल्लिकार्जुन अरकेरी (वय ६) असे बापाने नदीत बुडवून मारलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. मार्च सोळा तारखेला मुलाला महाराष्ट्रातील कराड जवळील वडोली गावाच्या जवळील कृष्णा नदीत बुडवून बापाने जीव घेतला. गावातील लोक वारंवार तुझा मुलगा तुझ्या सारखा दिसत नाही म्हणून सतवत असल्याने मल्लिकार्जुन अस्वस्थ झाला होता. (Fed up with people’s taunts, a father took his son’s life)

                       मार्च सोळा तारखेला मुलाला शाळेत घालून येतो म्हणून मल्लिकार्जुन घरातून मुलाला घेऊन बाहेर पडला. नंतर कराड जवळील वडोली येथे नेऊन नदीत मुलाला बुडवून मारले. मुलाला सिंदगी गावातील शाळेत दाखल केले असून तो हॉस्टेलमध्ये राहत असल्याचे मल्लिकार्जुन याने घरी आल्यावर सांगितले. एक एप्रिल रोजी सिद्धार्थ याचा वाढदिवस होता म्हणून पत्नी भाग्यश्रीने  मुलाला घरी घेऊन या असा तगादा लावल्यावर मल्लिकार्जुन पळून गेला.त्यामुळे संशय आल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत मल्लिकार्जुन याने मुलाला कृष्णा नदीत बुडवून मारल्याची कबुली दिली. सोळा मार्च रोजी कराडच्या मसूर पोलीस ठाण्यात लहान मुलाचा मृतदेह नदीत सापडल्याची नोंद झाली होती. त्याचे निवेदन पोलिसांनी जाहीर केले होते. हे निवेदन आणि मल्लिकार्जुन याच्या जबानीमुळे कृष्णा नदीत सापडलेला मृतदेह सिद्धार्थ याचा होता हे पोलीस तपासात सिद्ध झाले. (Fed up with people’s taunts, a father took his son’s life)

Related posts

भारताची आरोग्य व्यवस्था गंभीर

१५ लाख फॉलोअर्स असलेल्या कुत्र्याच्या मृत्यूची कहाणी

पाच कोटीच्या सोने तस्करीप्रकरणी भाजपाच्या पदाधिकाऱ्याला अटक