मुंबई : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. तसेच आयोगाने भाजपशी संगनमत करत मत चोरी केल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या या आरोपाला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. (Fadanvis slams Rahul)
भाजप नेते संबित पात्रा यांच्यापाठोपाठ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनही राहुल गांधींवर पलटवार केला. आयोगावर वारंवार टीका करणाऱ्या राहुल गांधींच्या डोक्यातली चीप चोरीला गेल्याची टीका त्यांनी केली. तसेच मतदार याद्यांमध्ये घोळ आहे असे सातत्याने सांगणारे राहुल गांधी निवडणूक आयोगाने बिहारमध्ये सुरू केलेल्या मतदार पुनरावलोकनला का विरोध करताहेत, असा सवालही त्यांनी केला. (Fadanvis slams Rahul)
पुनरावलोकन केल्याशिवाय बोगस मतदार कळणार कसे, आम्ही सातत्याने पुनरावलोकन करण्याची मागणी करत आहोत. त्यातूनच बोगस मतदार कळणार आहेत. या बाबीला राहुल गांधी विरोध का करताहेत? यातून त्यांचा दुटप्पीपणा लक्षात येतो, असे फडणवीस म्हणाले. (Fadanvis slams Rahul)
ते म्हणाले, “मतांची चोरी महाराष्ट्रातही नाही आणि भारतातही झालेली नाही. उलट चोरीला काही गेलेच असेल तर ती राहुल गांधींच्या डोक्याची चीप. त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे. त्यामुळे रोज ते त्याच त्याच गोष्टी बोलत आहेत. राहुल गांधी खोटं बोलतात आणि पळून जातात, वेगळी आकडेवारी देतात. मागच्या वेळी सांगितलं महाराष्ट्रात ७५ लाख मतदार वाढले. राहुल गांधींच्या हे लक्षात आले आहे की ते पुढच्या निवडणुकांमध्येही निवडून येणार नाहीत. त्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करत कव्हर फायरिंग करत आहेत.”
हेही वाचा :
राहुल यांनी फोडला बॉम्ब; पुराव्यानिशी उघड केली ‘मत चोरी’
राहुल गांधी हतबल : भाजपचे प्रत्युत्तर
मतापासून दूर ठेवून वंचितांचा आवाज दाबला जाऊ नये : अमर्त्य सेन