Expel Pawar : अजित पवारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा : हर्षवर्धन सपकाळ

Expel Pawar

 जमीर काझी : मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या कंपनीने पुण्यातील वतनाची ४० एकर जमीन भ्रष्ट मार्गाने बळकावल्याचे उघड झाले आहे.  हजारो कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटीत म्हणजे कवडीमोल भावाने हडप केली असून स्टँप ड्युटी फक्त ५०० रुपये दिली आहे. सरकारच्या ताब्यात असणा-या वतनाच्या या जमिनीचा व्यवहार झालाच कसा? असा प्रश्न विचारून भ्रष्ट  अजित पवार यांची हकालपट्टी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे, असे  आव्हान  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी दिले. (Expel Pawar)

 राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या या विषयाबाबत  प्रतिक्रिया देताना ते म्हणाले  की,  पार्थ पवार याची अमेडिया नावाची कंपनी असून त्याने कोरेगाव पार्क भागातील जमीन अत्यंत अल्प किंमतीत घेतली आहे, ज्या कंपनीने हा व्यवहार केला त्या अमेडिया कंपनीचे भागभांडवल फक्त एक लाख रुपये असून त्यांना या जागेत आयटी पार्क उभारायचे आहे आणि त्यास सरकारच्या उद्योग संचालनालयाने अवघ्या ४८ तासात मंजुरीही दिली. सरकारच्या ताब्यात असलेली वतनाची जमीन विकत घेता येते का ? स्टॅम्प ड्युटी माफ का केली?  असे प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित करून हा व्यवहार रद्द करावा व संपूर्ण व्यवहाराशी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी  केली आहे. (Expel Pawar)

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ‘सारखं मोफत कसं मागता, जरा हातपाय हलवा’ असा दम शेतकऱ्यांना देणाऱ्या अजित पवार यांच्या दिवट्याच्या जमीन व्यवहारात तब्बल २१ कोटीची स्टॅम्प ड्युटी माफ केली आहे. मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना अजित पवारांना वेदना का होतात? हा व्यवहार एक मोठा स्कॅम असून देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा केला पाहिजे, असेही मागणी केली. (Expel Pawar) 

Related posts

तीन महिन्यात एलपीजीच्या दरात ८१ टक्के वाढ; महागाईवर राहूल गांधींची सरकारवर टीका

व्यावसयिक सिलिंडरच्या दरात ९७३ रुपयांची वाढ

मंत्रीपदाच्या बोलीवर बच्चू कडूच्या हाती धनुष्यबाण!