Solar lights : शहरातील दलित वस्त्यामध्ये सोलर हायमास्ट लॅम्प उभारणीसाठी दोन कोटींचा निधी :  आमदार क्षीरसागर

Solar lights

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर शहरातील दलित वस्त्या प्रकाशमय करण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. (Solar lights)

शहरातील सुमारे १५ दलित वस्त्यांमध्ये सोलर हायमास्ट लॅम्प बसविण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे दोन कोटी निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत निधी मंजूर झाला आहे. (Solar lights)

दलित वस्त्यांमध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा अपुऱ्या आहेत. या नागरिकांचे जगणे बदलून त्यांच्याही वाट्याला चांगले आयुष्य यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षात या वस्त्यांमधील विकासकामांसाठी निधी देवून जीवनमान सुधारण्यास प्राधान्य दिले जात आहे. आजही शहरातील अनेक वस्त्यांमध्ये अंधाराचे साम्राज्य असल्याचे चित्र दिसत होते. याकरिता या ठिकाणी सोलर हायमास्ट लॅम्प बसविण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील दलित वस्त्या प्रकाशमय होणार असल्याची माहितीही या पत्रकात आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. (Solar lights)

या ठिकाणी बसणार सोलर हायमास्ट लॅम्प

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर कसबा बावडा, मातंग वसाहत कसबा बावडा, रमणमळा, कनाननगर, सदर बाजार, विचारेमाळ, इंदिरानगर झोपडपट्टी शिवाजी पार्क, सिद्धार्थनगर, सोमवार पेठ, सिद्धार्थ गल्ली लक्ष्मीपुरी, वारे वसाहत, गंजीमाळ, यादवनगर, मातंग वसाहत राजारामपुरी, टाकाळा खण माळी कॉलनी या परिसरात हे सोलर हायमास्ट लॅम्प बसविण्यात येणार आहेत.

Related posts

तीन महिन्यात एलपीजीच्या दरात ८१ टक्के वाढ; महागाईवर राहूल गांधींची सरकारवर टीका

व्यावसयिक सिलिंडरच्या दरात ९७३ रुपयांची वाढ

मंत्रीपदाच्या बोलीवर बच्चू कडूच्या हाती धनुष्यबाण!