मुंबई : प्रतिनिधी : ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारतीय लष्कर दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत असताना आणि संपूर्ण देश एकजुटीने उभा असताना काँग्रेसचे नेते मात्र पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कबर खोदण्याची भाषा करणाऱ्यांची कबर देशाची जनता खोदेल,” असा हल्ला केला. (Eknath Shinde attacks Congress)
राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण आणि पी. चिदंबरम यांच्या भूमिकेवर टीका करताना शिंदे म्हणाले की, लष्कराच्या कारवाईवर प्रश्न विचारणे म्हणजे थेट जवानांचे मनोबल खच्चीकरण करणे आहे. पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन ‘सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ अचूकपणे उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई अत्यंत प्रिसाईज असून कोणतेही नागरी नुकसान झाले नाही. या कारवाईमुळे भारताची लष्करी ताकद आणि राजकीय इच्छाशक्ती जगासमोर पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे, असे शिंदे म्हणाले. (Eknath Shinde attacks Congress)
मात्र, या शौर्यपूर्ण कारवाईनंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आलेली वक्तव्ये देशविघातक असूनही टीका देशप्रेमातून नाही, तर पाकिस्तान प्रेमातून होत आहेत. काँग्रेस नेत्यांची विधाने पाकिस्तानमध्ये हेडलाईन बनत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे,” असे त्यांनी सांगितले. (Eknath Shinde attacks Congress)