भारत चीन गदारोळावरुन आठ खासदारांचे निलंबन

Eight MPs suspended over the India-China border dispute

नवी दिल्ली : भारत आणि चीन वादावरुन संसदेत आज दुसऱ्या दिवशी गोंधळ पहायला मिळाला. विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केल्यानंतर सत्ताधारी खासदारांनी गोंधळ केला. दोन वेळा लोकसभेचे काम तहकबू करण्यात आले. काँग्रेसच्या सात आणि माकपच्या एक अशा आठ खासदारांना निलंबित करण्यात आले. (Eight MPs suspended over the India-China border dispute)

लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल सोमवारी राहूल गांधी यांनी भाषणात भारत चीन प्रश्नांवर माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकातील उल्लेख केल्यानंतर सभागृहात चांगलाच गदारोळ उडाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मंत्री किरण रिजजू यांनी राहूल गांधी यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. त्यानंतर सभागृहात गोंधळ झाला. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. (Eight MPs suspended over the India-China border dispute)

आज मंगळवारी पाचव्या दिवशी लोकसभेत पुन्हा गोंधळ उडाला. राहूल गांधी यांनी भारत चीन मुद्दा पुन्हा सुरू केल्यावर सत्ताधाऱ्यांनी पुन्हा आक्षेप घेतला. सत्ताधारी आणि विरोधी खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काँग्रेसच्या काही खासदारांनी पीठासन सभापतींच्या दिशेने कागद भिरकारवले. त्यानंतर पीठासीन सभापतींनी गुरदीप सिंह औजला. माणिकम टागोर, अमरिंदर सिंह राजा वारिंग, किरण कुमार रेड्डी, हिबी ईडन, डीन कुरियाकोस, प्रशांत पडोले या काँग्रेसच्या सात तर एस. वेंकटेशन या माकपच्या एका खासदारांचे निलंबन केले. या कारवाईला राहूल गांधी आणि प्रियंका गांधींनी विरोध केला. या निर्णयाच्याविरोधात संसदेच्या परिसरात आंदोलन करण्यात आले. (Eight MPs suspended over the India-China border dispute)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर