Double murder in Sangli : वाढदिवसादिवशी स्टेजवर सपासप वार करुन हत्या ; हल्लेखोरही जमावाच्या हल्ल्यात ठार

Double murder in Sangli

सांगली : प्रतिनिधी : वाढदिवसादिवशी शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर आलेल्या एका जमावाने धारधार शस्त्रांनी सपासप वार करुन खून केला. हल्लेखोरातील एकजण सापडल्याने जमावाने त्याला ठार मारले. सांगलीतील या डबल मर्डरने जिल्हा हादरुन गेला आहे. सांगली शहरातील गारपीर चौकात मंगळवारी रात्री ही घटना घडली. (Double murder in Sangli)

सांगली शहरात दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त गारपीर चौकात त्यांच्या घराजवळ स्टेज उभारण्यात आले. मोहिते मित्र, आप्तेष्ठांच्या शुभेच्छा स्वीकारत असताना एक जमाव त्यांना शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर आला. शुभेच्छा देताना त्यांच्या हातात बुके, केक नव्हता तर धारदार हत्यारे होती. जमावाने उत्तम मोहिते यांच्यावर धारदार हत्यारांनी सपासप वार करुन खून केला. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा पुतण्या योसेफ सतीश मोहिते प्रयत्न करत असताना जमवाने त्याच्यावरही हल्ला केला. तोही जखमी झाला. (Double murder in Sangli)

हल्ला करणारे आठ ते नऊ जण होते. त्यामध्ये शाहरुख उर्फ शब्या शेख होता. हल्ला करत असताना त्याच्या पायावर वार झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला. जमावाने त्याला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. एकाच ठिकाणी डबल मर्डर झाल्याने पोलिस प्रशासन हादरुन गेले. उत्तम् मोहिते यांच्यावर हल्ला करत असताना शाहरुखच्या पायाला चाकू लागन नस कापली गेल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन शाहरुखचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. (Double murder in Sangli)

पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. गुन्हा का घडला याचा पोलिस तपस करत आहेत. मोहिते यांच्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी गणेश मोरे, सतीश लोखंडे, शाहरुख शेख, बन्या उर्फ यश लोंढे, अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे, समीर ढोले अशी संशयितांची नावे असून ते सर्व सांगलीतील इंदिरानगर भागातील आहेत.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर