सत्ता स्थापनेच्या काळात गावी जायचे नाही का? : एकनाथ शिंदे

Eknath Shinde file photo

मुंबईः राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या मूळगावी दरे येथे गेले होते. तेव्हापासून राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते आराम करण्यासाठी गावी गेल्याचे सांगण्यात आले होते. शिंदे यांनी आज (दि.१) माध्यमांशी संवाद साधला. या वेळी बोलताना सत्ता स्थापन होत असताना गावी जायचे नाही का, असा सवाल त्यांनी केला आहे. मी नेहमीच गावी येत असतो, असेही ते म्हणाले.

महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव नाही. मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय नरेंद्र मोदी, अमित शाह घेतील. मी माझी भूमिका याआधीच स्पष्ट केली आहे. भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील, त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले. माध्यमांमध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत. आमची अमित शहा यांच्यासोबत एक बैठक झाली आहे. आता तिनही पक्षांच्या नेत्यांची दुसरी बैठकदेखील लवकर होणार आहे. त्या बैठकीत चर्चा होऊन महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय होईल, असे ते म्हणाले.

आम्ही जनतेला उत्तरदायित्व आहोत. महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव नाही. विरोधकांना काही काम राहिले नाही. त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेता होण्याइतके संख्याबळ नाही. झारखंडमध्ये त्यांचा विजय झाला. लोकसभेतही ते जिंकले, मग तेव्हा ईव्हीएम मशीन चांगले होते का? असा सवाल विरोधकांना केला आहे. शिंदे म्हणाले की, लाडक्या बहिणींनी, लाडक्या शेतकऱ्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले. सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने आले आहे. निवडणुकीच्या काळात खूप धावपळ झाली. मी एका दिवसात ८-१० सभा घेतल्या. माझ्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात सुटी घेतली नव्हती. धावपळीमुळे थकवा आला होता. त्यामुळे मी आराम करण्यासाठी गावाकडे आलो होतो. गावी आलो की, वेगळे समाधान मिळते. आता माझी तब्येत ठीक आहे, असे ते म्हणाले.

Related posts

Fonde

Fonde : फोंडेंवरील निलंबन मागे घ्या, अन्यथा संप  

Congress’s agitation

Congress’s agitation : मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही

Wedding thief

Wedding thief : पाहुणा बनून मंगलकार्यालयात चोरी करायचा