निशिकांत दुबेंना मोदी, शहा, बिर्लाचा पाठिंबा आहे का?

Does Nishikant Dubey have the support of Modi, Shah, and Birla

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधींना सभागृहात बोलू दिले नाही. पण भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सभागृहात चार ते पाच पुस्तके आणून नेहरु आणि गांधी कुटुंबावर वादग्रस्त विधाने केली. त्याला काँग्रेसच्या महिला खासदारांनी विरोध केला. पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी महिला गेल्या. त्यावर मोदीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने महिला खासदार गेल्या होत्या असा आरोप भाजप खासदार सौमित्र खान यांनी केला. त्यावर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले. तसेच खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या विधानाला पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा पाठिंबा आहे का? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला.

लोकसभा अध्यक्षांकडून निष्पक्ष भूमिकेची अपेक्षा

लोकसभेत घडलेला  गोंधळ आणि खासदार सौमित्र खान यांनी केलेल्या आरोपांवर खासदार वर्षा गायकवाड स्पष्टीकरण दिले. लोकसभेत राहुल गांधी जेव्हा चीनच्या घुसखोरीबाबत बोलतात, तेव्हा सातत्याने त्यांचा माईक बंद ठेवण्यात येतो. त्यांच्या भाषणामध्ये कोणी ना कोणी सातत्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आम्ही लोकसभा अध्यक्षांना सांगितले की, आम्हाला तुमच्याकडून निष्पक्ष भूमिकेची अपेक्षा आहे. तीन वेळा त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली.  शेवटी त्यांनी चार वाजता भेट दिली.  पण तेव्हा सुद्धा त्यांनी कोणतीच भूमिका घेतली नाही. संसदीय लोकशाहीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही देशाच्या संविधानावर पूर्ण विश्वास ठेवून आहोत. आम्ही त्याचा आदर करतो. काँग्रेस पक्षात असल्यामुळे आम्हाला महात्मा गांधींनी अहिंसा, सत्य आणि शांतता शिकवली आहे. आम्ही सत्ताधारी बसतात, त्या बाजूला गेलो, पण आम्ही फक्त बॅनर घेऊन गेलो होते असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले. (Does Nishikant Dubey have the support of Modi, Shah, and Birla)

भाजपकडून फेक नरेटिव्ह

खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, सभागृहात आम्ही बांगड्या घालून का गेलो? असा सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तर आम्हाला माहीत नव्हते की, आमच्या बांगड्यांवरूनही विषय वाढेल. आम्ही केवळ त्या ठिकाणी बॅनर घेऊन उभे होतो. त्यामुळे घाबरण्याचा प्रश्न काय? आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो, त्यामुळे त्या बॅनरमध्ये असे काय होते? असे कोणते पुस्तक होते जे घ्यायला पंतप्रधान मोदी घाबरत होते? असे सवाल वर्षा गायकवाड यांनी केला.  या पुस्तकामुळेच ते सभागृहात आले नाहीत. आमचे म्हणणे एकच आहे की, या विषयाला वेगळी दिशा देण्याचे काम सुरू आहे. काल ज्या पद्धतीने प्रसार माध्यमांत, लोकांमध्ये चर्चा झाल्या, त्यामुळे आज भाजपने फेक नरेटिव्ह पसरवले आहे, असेही यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या. (Does Nishikant Dubey have the support of Modi, Shah, and Birla)

दुबेकडून सोनिया गांधीबद्दल अश्लील विधान

निशिकांत दुबे यांनी केलेल्या विधानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे समर्थन होते का?  असा प्रश्न खासदार गायकवाड यांनी उपस्थित केला. ज्या पद्धतीने त्यांनी महिलांबद्दल, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत विधान केले. त्यांनी सोनिया गांधींबद्दल अश्लील विधान केले. त्यामुळे निशिकांत दुबेंच्या मनात किती विष आहे, हे आपण पाहिले आहे. भाजपने किती खोटे नरेटिव्ह तयार करायचे? याला काहीतरी मर्यादा असली पाहिजे. आम्ही महिला खासदार त्या बाजूला गेलो, पण आम्ही फक्त बॅनर धरले. ते लोक बॅनरला का घाबरले ? मी बाबासाहेबांची, गौतम बुद्धांची अनुयायी आणि काँग्रेसची कार्यकर्ता आहे. शांतता, अहिंसा आणि सत्यामध्ये विश्वास ठेवणारी आम्ही मंडळी आहोत. संसदीय लोकशाहीत काम करताना कशाप्रकारे काम केले गेले पाहिजे, याबाबतची परंपरा आम्हाला माहीत आहे. पण ते लोक बॅनरला घाबरले की रिपोर्टला घाबरले? असे सवाल गायकवाड यांनी केला. (Does Nishikant Dubey have the support of Modi, Shah, and Birla)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर