Congress warns on Vote Chori : मतचोरीबाबत कारवाई न झाल्यास कोर्टात जाणार : काँग्रेस

Congress warns on Vote Chori

मुंबई : विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी केल्याचे एकेका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी बंगळूरमधील महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजपा आणि आयोगाची भ्रष्ट युती पुढे आणली आहे. त्याप्रमाणेच मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला आहे. (Congress warns on Vote Chori)

याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. पण, ११ महिने झाले तरी अद्याप यावर कोणतीच कारवाई होत नाही. या मतचोरी प्रकरणी पुढील एका महिन्यात कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागेल, असा इशारा प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मंगळवारी (९ सप्टेबर) दिला.

गांधी भवन येथे पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले की, लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या ५ महिन्यांच्या कालावधीत राजुरा मतदारसंघात ५५ हजार मतदारांची वाढ दाखवण्यात आली. राजुरा मतदारसंघात १ ऑक्टोबर २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ११ हजार ६६७ ऑनलाईन बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यासंदर्भात काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी रितसर तक्रार दाखल केली. त्यानंतर ६८५३ मते डिलिट करण्यात आली. याप्रकरणी एफआयआरही दाखल केला आहे. पण पुढे काहीच कारवाई केलेली नाही. (Congress warns on Vote Chori)

ही ऑनलाईन बोगस मतदार नोंदणी करण्यात आली त्याचे आयपी ॲड्रेस (IP address), ई मेल आयडी (email id) आणि मोबाईल नंबरची माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे पण आजपर्यंत ती देण्यात आलेली नाही. ही माहिती दिल्यास चोर कोण, हे उघड होईल म्हणून पोलीस आणि प्रशासन माहिती देत नाही, असे ते म्हणाले. (Congress warns on Vote Chori)

लोंढे पुढे म्हणाले की, राजुरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवाराकडे ६१ लाख रुपये व निवडणूक साहित्य सापडले. निवडणूक आयोगाच्या एफएसटी पथकाने ही कारवाई केली आहे. गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पण आजपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही. या प्रकरणी काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी निवडणूक आयोग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे वारंवार निवेदन देऊनही कारवाई संदर्भात काहीच हालचाल केली जात नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस जनतेच्या न्यायालयात लढा देत आहेच पण न्यायालयातही लढा देऊ, असे अतुल लोंढे म्हणाले.

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष धोटे यांनीही यावेळी मतचोरीप्रकरणाची सविस्तर माहिती दिली.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर