केंद्र सरकाकडून पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात

Central Government cuts excise duty on petrol and diesel

नवी दिल्ली : आखाती युद्धामुळे जगभरातील इंधन संकट गहिरे झाले असताना भारत सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्यूटी) प्रति लिटर १० रुपयांनी कमी केली आहे. एक्साईज ड्यूटी कमी झाल्याने त्याचा फायदा ग्राहकांना होणार का असा प्रश्न केला जात आहे.  (Central Government cuts excise duty on petrol and diesel)

होर्मुझ सामुद्रधुनीमधून होणारी उर्जा वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे जगात तेलाचे संकट निर्माण झाले आहे. भारत सरकारने उत्पादन शुल्कात दहा रुपयांची कपात करुन तेल कंपन्यांना दिलासा दिला आहे. पेट्रेलवरील उत्पादन शुल्क दहा रुपयांनी कमी करुन तीन रुपये केली आहे. डिझेलवरील उत्पादक शुल्क दहा रुपयाने घटवल्याने एक्साईज ड्यूटी शून्यावर आली आहे. याचा फायदा तेल कंपन्यांना होणार आहे. पण हा फायदा तेल कंपन्या ग्राहकांना देणार का याची चर्चा सुरू झाली आहे. (Central Government cuts excise duty on petrol and diesel)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर