मुंबई : प्रतिनिधी : महिन्याभरापूर्वी झालेल्या आयसीसी टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील मुंबईत झालेल्या सेमीफायनल सामन्याची तिकीटे काळाबाजारात विक्री केल्याप्रकरणी माजी क्रिकेटपटूला अटक केली आहे. तो मुंबईच्या अंडर १९ संघाचा माजी खेळाडू असून बलवंतसिंह स्वरुपसिंह सोधा असे या माजी क्रिकेटपटूचे नाव आहे. (Former Cricketer Arrested in Ticket Black-marketing)
गेल्या महिन्यात आयसीसी टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या स्पर्धेतील तिकीटांच काळाबाजार झाल्याची माहिती पोलिसांना कळाली. पोलिसांनी तिकीटांच्या काळाबाजारप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. सोधा हा मालाडचा रहिवासी असून ते क्रिकेट कोचिंगशी संबधित आहेत. तिकीट विक्री काळाबाजाराचे धागेदारे पोलिसांना मिळाले आहेत. शिक्षण आणि क्रीडा प्रशासनाशी या रॅकेटचे धागेदोरे पोचले आहेत. अंधेरीतील एका नामवंत कॉलेजचा स्पोर्टस् टीचर या प्रकरणाचा प्रमुख आरोपी आहे. तो मुंबई क्रिकेट असोसिएशनचा (एमसीए) सदस्य आहे. त्याला मिळालेली कॉम्प्लिमेंट्री आणि पेड तिकीटे त्याने एजंटाकडे सोपवली होती. ही तिकीटे बाजारात जास्त किंमतीत विकली गेली. (Former Cricketer Arrested in Ticket Black-marketing)
सोधीला अटक केल्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. चौकशीत अशी माहिती पुढे आली आहे की २०१९ मध्ये मुंबईच्या अंडर १९ संघात तो खेळत होता. उदयोन्मुख खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. कालांतराने त्याचे कोचिंग सुरू केले. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो नामवंत खेळाडूसमवेत क्रिकेट खेळला आहे. या संपर्काचा वापर करुन तो या रॅकेटमध्ये सहभागी झाला आहे.
डी.बी.मार्ग पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करताना माटुंगा येथील एका कॉलेजच्या शिपायाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तिकीटाचा काळाबाजार पुढे आला. एक तिकीट २० ते २५ हजार रुपयांना विकले गेले आहे. हे नेटवर्क मोठे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (Former Cricketer Arrested in Ticket Black-marketing)