भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील तुणतुणं वाजवणाऱ्या मास्तरासारखी

BJP's situation is like that of the schoolmaster in the film 'Pinjra

सांगली : प्रतिनिधी : सांगली महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचार रॅलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील तुणतुणं वाजवणाऱ्या मास्तरासारखी झाली आहे, अशी बोचरी टीका केली.

आमदार जयंत पाटील म्हणाले, भाजपाची अवस्था ही पिंजरा नावाच्या चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे. मास्तर तमाशा बंद करायला आहे होते. पण मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला आहे की तोच तोच तुणतुणं घेऊन पुढे उभा राहिला आहे, भाजपने अंबरनाथ नगरपालिकेत काँग्रेसबरोबर तर अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत एमआयएम बरोबर युतीबाबत बोलताना जयंत पाटील यांनी शेरे शायरीतून टोला मारला. ‘ये बंद करने आए थे तवायफो के कोठे, मगर सिक्को की खन सुनकर खुद ही मुजरा कर बैठे… अशा शब्दात खिल्ली उडवली. ( BJP’s situation is like that of the schoolmaster in the film ‘Pinjra)

अटल बिहारी वायपेयी यांनी १९९६ मध्ये भाजपला सर्वांधीक जागा मिळवल्या पण त्यांच्याकडे बहुमत नव्हते. पण वेगवेगळ्या पक्षांना एकत्र करुन सरकार बनवले असे सांगून जयंत पाटील भाजपची सद्यस्थिती स्पष्ट केली. सध्या काँग्रेसमधील अनेकजणांना ओढून भाजपात नेत आहेत. ज्या ओवीसीवर टीका केली त्याच्या ओवोसीच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. सत्तेससाठी कोणाशीही आघाडी करायला यांना काही वाटत नाही. काँग्रेसमुक्त भारत करायला निघाला भाजप आता काँग्रेसयुक्त झाला आहे. अशी टीका केली. ( BJP’s situation is like that of the schoolmaster in the film ‘Pinjra)

Related posts

२८ लाखांची लाच घेताना महिला पोलिस अधिकारी जाळ्यात

सासूने मारला जावयाच्या घरातील साडेसोळा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

प्रायश्चित म्हणून फडणवीसांनी राजीनामा द्यावा : हर्षवर्धन सपकाळ