भाजप आमदारांची मंत्री चंद्रकांत पाटील, मुश्रीफांवर टीका

BJP MLAs criticize Ministers Chandrakant Patil and Mushrif

कोल्हापूर : प्रतिनिधी : चंदगडचे भाजप आमदार शिवाजी पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत घरचा आहेर दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही टीका केली आहे. मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी चंदगडसाठी काहीही केलेले नाही, असा आरोप आमदार पाटील यांनी केला. (BJP MLAs criticize Ministers Chandrakant Patil and Mushrif)

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून महायुती या निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याची घोषणा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.  पण या बैठकीला भाजप आमदार शिवाजी पाटील यांना बोलावले नव्हते.

सतेज पाटील आमचे विरोधक नाहीत

आमदार शिवाजी पाटील म्हणाले. आमचे राष्ट्रीय नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी मला गोकुळच्या बैठकीला बोलावलं नाही. हसन मुश्रीफ यांना बोलावलं. पश्चिम महाराष्ट्राचे नेते सुमित कदम यांना बोलावले. कोल्हापूर जिल्हा, गोकुळचा सुमित कदम यांचाही काहीही संबध नाही. पण आम्हाला बोलावले नाही. हे जर आम्हाला जमेत धरत नसतील तर सतेज पाटील आमचे विरोधक नाहीत, असा इशाराही पाटील यांनी पक्षाला दिला आहे. (BJP MLAs criticize Ministers Chandrakant Patil and Mushrif)

मुश्रीफांच्या घरी अनेक संस्था

गोकुळमध्ये काय चालतंय हे मिडियातून कळते. अपात्र केलेल्या संस्था पात्र केल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर बाब घालणार आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना आमदार पाटील यांनी मुश्रीफांच्या घरात अनेक संस्था असून या संस्था कुठुन आल्या असा प्रश्न केला. माझ्या मतदारसंघात साम-दाम- दंड चा वापर करुन गोकुळच्या दहशतीच्या जोरावर शेतकऱ्यांच्याकडून ठराव गोळा केला जात आहेत, असा आरोप केला.

हसन मुश्रीफ यांनी पंचवीस वर्षाच्या मंत्रीपदाच्या काळात चंदगडसाठी काय केले? असा सवालही केला. गोकुळ, जिल्हा बँकेत तुम्ही, मंत्री तुम्ही, मग आम्ही जायचे कुठे? आम्ही फक्त झेंडे घेऊन फिरायचे का? असा सवालही त्यांनी केला.

चंद्रकांतदादांनी चंदगडसाठी काहीही केले नाही

मुश्रीफांबरोबर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही चंदगडसाठी काहीही केले नाही असा आरोप केला. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील हे मंत्री आहेत. त्यांच्याकडे खूप मोठे पद आहे. पण त्यांनी चंदगडसाठी काहीही केले नाही. आता चंद्रकांतदादा मुश्रीफांना घेऊन चालले आहेत. पण आम्ही भाजपचे असूनही आम्हाला जवळ केले नाही.

जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना स्ट्राँग आहे पण भाजप कुठे आहे असा सवाल त्यांनी केला. महाडिक आणि आवाडे परिवार सक्षम आहे. पण पक्ष वाढणार कधी. मी कोणाच्या दबावाला बळी न पडता भाजप कार्यकर्त्यांसाठी लढत राहणार असेही ते म्हणाले. (BJP MLAs criticize Ministers Chandrakant Patil and Mushrif)

Related posts

शिवकुमारांच्या मंत्रीमंडळातील मंत्री रामलिंगा रेड्डी यांचा दोन दिवसात राजीनामा

भाजप सरकारने देशाला आर्थिक मंदीच्या खाईत लोटले

चाकूने सपासप ३२ वार करत युवतीची हत्या