Asim Sarode’s charter cancelled  : असिम सरोदेंची तीन महिने वकिलीची सनद रद्द ; सरोंदेंचे भाजपवर आरोप

Asim Sarode's charter cancelled

मुंबई : प्रतिनिधी : सुप्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला आहे.  सरोदे यांनी  विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपाल यांच्याबाबत केलेले विधान आता भोवले आहे. मात्र असीम सरोदे यांनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. तसेच शिवसेनेच्या सुनावणीआधी मुद्दाम केलं का? असा सवाल करत भाजपावर देखील आरोप केले आहेत. (Asim Sarode’s charter cancelled)

संविधानिक पदावर बसलेल्या दोन व्यक्तींबाबत केलेल्या विधानामुळे सरोदे वकिलीच सनद तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने अ‍ॅडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे आदेश दिलेले आहेत. असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

लेखी माफी मागण्याची संधी सरोंदेंनी नाकारली

सरोदेंनी केलेल्या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला आणि न्यायालयांविषयी अविश्वास निर्माण झाल्याची तक्रार एका तक्रारदाराने केली होती. सरोदेंचे वक्तव्य अशोभनीय, गैरजबाबदार व बदनामीकारक असल्याचे नमूद करून बार कौन्सिलकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदाराने १९ मार्च २०२४ रोजी सरोदेंना लेखी माफी मागण्याची संधी दिली, पण त्यांनी ती नाकारली. त्यामुळे आता त्यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. या तक्रारीनंतर वकील विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने असीम सरोदे यांच्या भाषणाचे ट्रान्सक्रिप्ट आणि व्हिडिओ क्लिप पाहिल्या होत्या. ज्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.वकील विवेकानंद घाटगे यांनी पाहिलेल्या व्हिडीओमध्ये वकील असीम सरोदे हे राज्यपाल फालतू आहेत व न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे, असे स्पष्टपणे म्हणताना दिसत आहेत. (Asim Sarode’s charter cancelled)

शिवसेना चिन्ह सुनावणीत सहभागी होता येणार नाही

या कारवाईनंतर त्यांना न्यायालयात युक्तीवाद करता येणार नाही. ज्याचा परिणाम शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान पाहायला मिळेल. कारण, असीम सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत. त्यामुळे या प्रकरणी १२ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीत सरोदे यांना सहभागी होता येणार नाही. तर, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने तीन महिन्यांसाठी असीम सरोदेंची सनद स्थगित केल्याने आता त्यांना थेट फेब्रुवारीमध्ये त्यांना वकील म्हणून कामकाज पाहता येईल.

तक्रार करणारा वकील भाजप कार्यकर्ता

महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनने घेतलेल्या निर्णयाबाबत बोलताना असीम सरोदे म्हणाले यांनी असा निर्णय होईल, असं अपेक्षा मला कधीच नव्हती. त्यामुळे या निर्णयामुळे मला प्रचंड वाईट वाटले आहे, अशी प्रतिक्रिया दिली. माझ्या विरोधात वकिली करणाऱ्या राजेश दाभोलकरने तक्रार केली आहे. राजेश दाभोलकर हा भाजपाचा कार्यकर्ता आहे. राजेश दाभोलकर यांचे सर्व फोटो भाजपा नेत्यांसोबत आहेत. पंतप्रधान मोदी आणि आशिष शेलार यांच्यासोबत फोटो आहेत, असा आरोप सरोदे यांनी केला. (Asim Sarode’s charter cancelled)

मी बोललेलो चुकीचे आहे हे दाखवून दयावे

कारवाईवर बोलताना असीम सरोदे म्हणाले की, मी गैरवर्तणूक केली आहे, असा शब्द वापरला आहे. तसेच राजेश दाभोलकरने सर्वांना ३८ मिनिटांच्या भाषणाचा पेन ड्राईव्ह दिला होता. उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालय हा कार्यक्रम घेतला होता. तेव्हा आमदार अपात्र या विषयावर मी बोललो होतो. तेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले भगतसिंह कोश्यारी हे फालतू माणूस आहेत, पण महत्त्वाच्या पदावर बसलेले असल्याने आपल्याला तसे बोलता येत नाही, असं म्हटल्याचं मी मान्य करतो. परंतु सर्वोच्च न्यायालयानं १० व्या शेड्युलनुसार कोण पात्र, कोण अपात्र याबाबतचा निर्णय घ्या, असे राहुल नार्वेकर यांना सांगितले होते. पण राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासाचा विश्वासघात केला, हे सुद्धा मी म्हणालो होतो. न्याय व्यवस्थेत न्यायाधीश भ्रष्टाचारी आहेत, असे देखील मी म्हणालो होते. पण हे सर्व चुकीचे आहे, असे कोणीही दाखवून द्यावे, असे आव्हान करतानाच असीम सरोदे यांनी म्हटले की, मी जे काही म्हटलं ते मला मान्य आहे, पण तुम्ही जो चुकीचा अर्थ काढला आहे, तो मला मान्य नाही, असे मी म्हटले आहे आणि ते जजमेंटमध्ये आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

1 comment

Almeda Conklin November 8, 2025 - 7:40 pm
Hi maharashtradinman.com Owner!

Comments are closed.

Add Comment