Arrest of Marathi people : मीरा भाईंदर मोर्चात मराठी माणसांची धरपकड

Arrest of Marathi people

मुंबई : प्रतिनिधी : मीरा भाईंदर मध्ये मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी मराठी माणसाची धरपकड केल्याने संताप व्यक्त केली. पोलिसांनी दडपशाही करत मोर्चात सहभागी होणाऱ्यांना पोलिसी बळाचा वार करुन पकडून नेले. गुजराती व्यापाऱ्यांना परवानगी अन् मराठी माणसाला जमावबंदी ही आणीबाणी नाही तर काय? अशी टीका मनसेचे संदीप देशपांडे यांनी केली आहे. (Arrest of Marathi people)

मीरा भाईंदरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदी मराठी वादी उफाळून आला आहे. ओम शांती चौकात स्थानिक व्यापाऱ्यांनी यापूर्वी आंदोलन केले होते. त्याच चौकातून आज मराठी एकीकरण समितीकडून मोर्चाचे आयोजन केले आहे.  मीरा भाईंदर भागात कलम १४४ लागू करण्यात आले असून जमावबंदी केली जात आहे.  या मोर्चासाठी येणाऱ्या मराठी माणसांना आणि मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जात आहे. कोणत्याही पक्षाशी संबंध नसलेल्या मराठी महिला आणि पुरुषांनाही पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसवून ताब्यात घेतले जात आहे. ताब्यात घेताना महिला आणि माहिलांची झटापटही पहायला मिळाली. पोलिसांनी महिलांना पोलिसांची वाहने, रिक्षा आणि बसमध्ये डांबून नेले. महाराष्ट्रात मराठी माणसाला परवानगी नाकारली जात आहे, हे मोरारजी देसाईचे सरकार असल्याचा संताप मोर्चेकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे तीन जुलै रोजी याच चौकातून मीरा भाईंदर येथील व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर मराठी एकजूट दाखवण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले त्याला परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना आणि कोणत्याही पक्षाशी संबंधीत नसलेल्या मराठी माणसांना ताब्यात घेतले आहे. (Arrest of Marathi people)

मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून सोमवारी मध्यरात्रीपासून  ओम शांती चौकाला छावणीचे स्वरुप आले आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांना मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आज सकाळी 10 वाजतापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आले. ओम शांती चौकात मराठी माणूस येथे एकवटू लागला त्यानंतर येथे महिला आणि पुरुषांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याचे काम पोलिसांकडून सुरु करण्यात आले आहे. पोलिसांकडून मीरा रोड येथे कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे. पोलिसांचा विरोध असतानाही ‘मराठी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणा देत मोर्चा निघाला आहे. या मोर्चात मराठी एकीकरण समिती, मनसे, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र सरकारचा निषेध मोर्चेकऱ्यांकडून केला जात आहे. एका मोर्चेकऱ्याने म्हटले आहे की, नया निजाम आहे, ही आणीबाणी आहे. (Arrest of Marathi people)

मोर्चाआधीच गोवर्धन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनसेचे नेते धुरी हे देखील मीरा रोड येथे पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या मोर्चाबद्दल म्हटले आहे की, आंदोलकांनी आम्हाला त्याच मार्गावरुन मोर्चा न्यायचा आहे, असा आग्रह धरला होता, त्यामुळे पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारली. त्या मार्गावरुन मोर्चा निघाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी पोलिसांची बाजू घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवन परिसरात म्हणाले. मीरा रोड येथील मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत याचा निषेध केला आहे.

मनसेचे संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारावर टीका केली. ते म्हणाले,  ‘महाराष्ट्रात मराठी अमराठी वाद निर्माण करुन भाजपला निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक माथी भडकवण्याचे प्रयत्न होत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून हे दंगली घडवण्याचे षडयंत्र आहे. भाजपने आतापर्यंत दंगली घडवूनच निवडणुका जिंकल्या आहेत. मराठी विरुद्ध अमराठी दंगली घडवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपच्या दंगलखोर नेत्यांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.

मंत्री प्रताप सरनाईकांच्या दिशेने भिरकावली बॉटल

Pratap Sirnaik

मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना अटक करण्याचे आव्हान देत मोर्चात सहभाग घेतला. पण, मोर्चाच्या ठिकाणी पोहोचताच प्रताप सरनाईक यांच्याविरोधात काही आंदोलकांनी घोषणाबाजी केली. ‘प्रताप सरनाईक गो बॅक, जय गुजरात अशा घोषणा,’ आंदोलकांनी सरनाईकांविरोधात दिल्या. मराठा एकीकरण समितीचे प्रमुख गोवर्धन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना घेऊन सरनाईक मोर्चात सहभागी झाले. त्यावेळी घोषणाबाजी करत एकाने त्यांच्या दिशेने पाण्याची बॉटल फेकून मारली. त्यानंतर गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी त्यांना तातडीने गर्दीतून बाहेर नेले. त्यानंतर ते परत निघून गेले

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर