निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेला ब्रेक; बळीराजा संकटात

Announcement of Farmer Loan Waiver Put on Hold

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील विधान परिषद निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफी योजनेच्या घोषणेला ब्रेक लागला आहे. आज मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीची घोषणा होणार होती. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका राज्यातील हजारो शेतकऱ्यांना बसणार आहे.

राज्यातील साडेपाच लाखांपेक्षा आधिक शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती. त्यात अंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत असलेल्या थकीत दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज पूर्ण माफ केले जाणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जफेड केली आहे त्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. (Announcement of Farmer Loan Waiver Put on Hold)

आज राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत कर्जमाफी देण्यास मंजुरी दिली. पण आचारसंहिता संपेपर्यंत निर्णय जाहीर करता येणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल २२ जून रोजी जाहीर होणार असून त्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे. २२ जूनलाच पावसाळी अधिवेशनात सुरुवात होणार आहे. अधिवेशनात शेतकरी पीक कर्ज माफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. (Announcement of Farmer Loan Waiver Put on Hold)

कर्जमाफीची घोषणा न झाल्याने शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्यास अडचणी येणार आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना होणार आहे. मान्सूनचे आगमन लवकरच होणार असून त्यासाठी पीक कर्जाची आवश्यकता आहे. पण जुने कर्ज फेडल्याशिवाय नवीन कर्ज मिळणार नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. (Announcement of Farmer Loan Waiver Put on Hold)

Related posts

झिनेदीन झिदानचा मुलगा अल्जेरियाकडून खेळणार

कमकुवत पंतप्रधानामुळेच पेपरफुटी : उदय भानू चिब

अखेर सीबीएसई अध्यक्ष राहूल सिंग आणि सचिव गुप्तांची बदली