भारताच्या ढिसाळ कारभारामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब

Japanese Minister's objections regarding the bullet train

नवी दिल्ली : मुंबई अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाला भारताच्या ढिसाळ कारभारामुळे विलंब होत आहे, असा आरोप जपानचे माजी मंत्री हिदेकी माकिहारा यांनी केला. जपानचे माजी मंत्री माकिहारा यांचे आरोप भारताचा परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळले आहेत. प्रकल्प लांबणीवर पडल्याने प्रकल्पाचा खर्चात ८० टक्के वाढ झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. मुंबई अहमदाबाद  बुलेट ट्रेन हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पाला महाराष्ट्रातून यापूर्वी विरोध झाला आहे. (Japanese Minister’s objections regarding the bullet train)

भारतीय मंत्री, अधिकाऱ्यांचे वर्तन स्वार्थी

जपानचे माजी मंत्री हिदेकी माकियारा यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विलंबाबद्दल सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. बैठका आणि वाटाघाटीदरम्यान भारताच्या बाजूने दिलेले शब्द फिरवण्यात आले आहेत. भारतीय मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्याचे वर्तन अत्यंत बेजबाबदार आणि स्वार्थी होते. सुरक्षेतसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सिग्नलिंग प्रणालीतून जपानला बाजूला ठेवल्याने त्यांनी या प्रकल्पाला अयशस्वी म्हटले आहे. प्रकल्प लांबणीवर पडल्याने खर्चात ८० टक्के वाढ झाली आहे असा आरोप केला आहे. (Japanese Minister’s objections regarding the bullet train)

भारताकडून आरोपाचे खंडन

माकिहारा यांच्या आरोपानंतर भारताने त्यांच्या आरोपाचे खंडन केले आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि रेल्वे विभागाने माकिहारा यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी  माकिहाराचे यांचे वैयक्तिक मत असून ते वास्तवापासून दूर आहेत. दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय चर्चा आणि प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या गतीने सुरू आह. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा (सुरत- बिलिमोरा) १५ ऑगस्ट २०२७ पासून सुरू करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. (Japanese Minister’s objections regarding the bullet train)

Related posts

कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; दोघांना अटक

मतदारयादीतून नाव काढल्याने नागरिकत्व रद्द होत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

अबब राज्याची ३० हजार कोटी महसूली तुट! ;कॅगकडून सरकारवर कडक ताशेरे