कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूरात भरदुपारी झालेल्या गोळीबारात भाजपचा प्रमुख कार्यकर्ता सुरज साखरे गंभीर जखमी झाला. गोळीबार करणाऱ्या दोघांच्या अवघ्या बारा तासात पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सुरज साखरे हा जरी भाजपचा कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर दरोडा, अपहरण, खासगी सावकारी, खंडणीचे १२ गुन्हे दाखल झाले आहेत. अटक केलेल्या संशयितांकडून पोलिस गोळीबाराचे कारण शोधत आहेत. (Shooting at Suraj Sakhare)
पोटात दोन गाेळ्या झाडल्या
क्रांतीसिंह नाना पाटील नगर चौकात गुरुवारी दुपारी गुंड सुरज साखरे याच्यावर गोळीबार झाला. एका इमारतीत साखरे याने दुकानगाळा घेतला होता. तिथे तो कार्यालय सुरू करणार होता. कार्यालयातील कामाची पाहणी करण्यासाठी तो सहकाऱ्यासमवेत कारने आला होता. कारमधून उतरुन तो कार्यालयाजवळ आला असता मोपेडवरुन आलेल्या दोघांनी तरुणांनी दोन ते अडीच फूटांवरुन सुरजवर गावठी पिस्तूलातून गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी चुकली. दोन गोळ्या त्यांच्या पोटात घुसल्या. बचावासाठी सुरज त्यांच्यावर दगड फेकले. त्यामुळे पळून जाणारे मोपेडवरुन खाली पडले. त्यानंतर ते क्षणात उठले असून सानेगुरुजी वसाहतीच्या बाजूने पळून गेले. कारमधील त्याचे सहकारी सुरजकडे धावले. त्यांनी जखमी अवस्थेतील सूरजला कारमधून खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. (Shooting at Suraj Sakhare)
जयसिंगपूर येथे दोघांना अटक
या घटनेने शहरात खळबळ उडाली. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. आज शुक्रवारी दुपारी जयसिंगपूरजवळ दोघां संशयितांना अटक केली. रफीक उर्फ देवा पिरसाहेब मुल्ला (वय ३०, रा. विक्रमनगर, कोल्हापूर) व शाहबाजू राजू मुल्ला (वय २३) अशी त्यांची नावे आहेत. ते दोघे कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक जालिंदर जाधव, पोलिस अंमलदार वैभव पाटील, संतोष बरगे, गजानन गुरव, महेंद्र कोरवी, सत्यजीत तानुगडे, शिवानंद मठपती, परशुराम गुजर,सागर चौगुले, अरविंद पाटील यांनी संशयितांना पकडण्यात महत्वाचे काम केले. (Shooting at Suraj Sakhare)