Ambabai Murti open for devotees : अंबाबाई मूर्ती गुरुवारपासून भाविकांना दर्शनासाठी खुली

Ambabai Murti open for devotees

कोल्हापूर : प्रतिनिधी : रासायिनक संवर्धन प्रक्रियेनंतर गुरुवारी १४ पासून अंबाबाई मूर्ती दर्शनासाठी भाविकांना खुली राहणार आहे. गेले दोन दिवस सुरू देवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया सुरू होती. आज बुधवारी गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. (Ambabai Murti open for devotees)

केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून गेले दोन दिवसांपासून अंबाबाईच्या मूर्तीवर संवर्धनाची प्रक्रिया सुरू आहे. नवी दिल्ली येथून आलेल्या या पथकामध्ये उपअधीक्षक डॉ. विनोद कुमार, निलेश महाजन, सुधीर वाघ, मनोज सोनवणे या तज्ज्ञांचा समावेश होता. सोमवारी (११ ऑगस्ट) गाभाऱ्यातील आद्रतेमुळे मूर्तीवर पडलेले पांढरे चट्ट्यांची भिंगाच्या सहाय्याने पाहणी करुन यावर संवर्धनाची प्रक्रिया करण्यात आली. आज बुधवारी झालेल्या संवर्धनाच्या कामाची जिल्हाधिकारी अमोल शेडगे यांच्यासह पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञ पथकाने पाहणी केली. संवर्धनानंतर मूर्तीच्या चेहऱ्यावरील बारकावे स्पष्ट दिसत असून उत्सव मूर्तीचे सौंदर्य अधिक खुलणार आहे. या प्रक्रियेसाठी अंबाबाई मंदिरातील मुख्य गाभारा प्रशासनाकडून दोन दिवस बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळं मूळ मूर्तीच्या दर्शनाऐवजी उत्सवमूर्ती व देवीतत्व कलश पेटी चौकात प्रतिष्ठापित करण्यात आली. संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळं उद्या गुरुवापासून अंबाबाई देवीचे दर्शन भाविकांसाठी खुलं होणार आहे. (Ambabai Murti open for devotees)

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज गायकवाड यांनी सांगितले की  “दोन दिवस संवर्धनाची प्रक्रिया सुरू असल्यामुळं देश आणि राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी अंबाबाईचं दर्शन देवस्थान समितीच्या वतीनं बंद ठेवण्यात आलं होते. आता संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवारपासून  करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीचं दर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. स्वातंत्र्य दिन आणि येणाऱ्या सलग सुट्ट्यांमुळं कोल्हापुरात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. याचं सर्व नियंत्रण देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात येईल,” (Ambabai Murti open for devotees)

Related posts

अल्पसंख्याक मुलींच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्या : सुनेत्रा  पवार 

मराठी सक्तीचीच या मुख्यमंत्र्यांच्या  घोषणेचे ‘म्यांव’ का झाले?;  संजय राऊतचा हल्लाबोल 

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘व्हीएसआर’ला १४५ कोटींचे वाटप