Harbhajan Singh : भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाका : हरभजनसिंग

Harbhajan Singh

नवी दिल्ली : ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेला प्राधान्य देताना माजी फिरकीपटू हरभजन सिंगने अशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकावा, अशी जोरदार मागणी केली आहे. सीमेवरील भारतीय सैनिकांचे बलिदान लक्षात घेण्याची गरज त्याने व्यक्त केली. भारताचा समावेश ओमान, यजमान संयुक्त अरब अमिराती आणि पाकिस्तान यांच्यासोबत गट अ मध्ये आहे. दरम्यान, गट ब मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. नऊ सप्टेंबरपासून युएईमध्ये अशिया चषकातील सामन्यांना प्रारंभ होत आहे. (Harbhajan Singh)

नुकत्याच संपलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सचा (डब्ल्यूसी)  हरभजनसिंग सहभागी झाला भाग होता. या स्पर्धेत  इंडिया चॅम्पियन्सने ग्रुप स्टेज आणि सेमीफायनलमध्ये पाकिस्तान चॅम्पियन्सशी खेळण्यास नकार दिला होता. शिखर धवन, युवराज सिंग, हरभजन, इरफान पठाण, सुरेश रैना आणि युसूफ पठाण या दिग्गज खेळाडू असलेल्या संघाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही भूमिका घेतली .

आगामी आशिया चषकात भारताने पाकिस्तानवर बहिष्कार टाकावा का, असा प्रश्न हरभजनसिंगला विचारले असता आम्ही त्यांना इतके महत्त्व का देतो? असा सवाल केला. हरभजनसाठी, “राष्ट्र प्रथम येते,” आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने शेजाऱ्यांविरुद्ध खेळण्यास नकार द्यावा असे त्याचे मत आहे. (Harbhajan Singh)

“काय महत्वाचे आहे आणि काय नाही हे त्यांना समजून घेणे आवश्यक आहे. माझ्यासाठी, सीमेवर उभा राहणारा सैनिक महत्वाचा आहे.  ज्याचे कुटुंब त्याला भेटत नाही.  जे कधी आपल्या प्राणाची आहुती देतात आणि कधी घरी परतत नाहीत.  त्यांचे बलिदान आपल्या सर्वांसाठी खूप मोठे आहे.

त्या तुलनेत, भारताने पाकिस्तानशी क्रिकेट सामना खेळणे लहान गोष्ट आहे. आपण एक क्रिकेट सामना खेळणे देखील वगळू शकत नाही. ही खूप लहान गोष्ट आहे असे हरभजनने टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉमला एका खास मुलाखतीत सांगितले.

सीमेवर लढाई होत असेल, दोन्ही देशांमधील तणाव असेल आणि आपण क्रिकेट खेळायला जातो, असे होऊ शकत नाही. जोपर्यंत हे मोठे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत क्रिकेट ही खूप छोटी बाब आहे.

“आमच्या सरकारचीही तीच भूमिका आहे, ‘खून और पानी एक साथ नहीं बह सकते’.  सीमेवर लढाई सुरू असेल, दोन्ही राष्ट्रांमध्ये तणाव असेल आणि आपण क्रिकेट खेळायला जाऊ. जोपर्यंत हे मोठे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत क्रिकेट ही एक अतिशय छोटी बाब आहे. राष्ट्र नेहमीच प्रथम येते,” असे हरभजन म्हणाला. (Harbhajan Singh)

“आपली ओळख काहीही असो, ती या देशामुळे आहे. तुम्ही खेळाडू असाल, अभिनेता असाल किंवा इतर कोणीही असाल – कोणीही राष्ट्रापेक्षा मोठे नाही. देश प्रथम येतो आणि आपण त्याच्याप्रती असलेले कर्तव्य पार पाडले पाहिजे. सीमेवर आमचे बांधव उभे आहेत, त्यांचे धैर्य बघा, ज्या मोठ्या हृदयाने ते घरी परतत नाहीत तेव्हा त्यांच्या कुटुंबावर काय हाल होतात याचा विचार करा आणि आम्ही क्रिकेट खेळत आहोत. (Harbhajan Singh)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर