बेळगाव : प्रतिनिधी : महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी कर्नाटकात अक्का पथक कार्यरत राहणार असून त्याचा शुभारंभ बेळगावात महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते वीर राणी कित्तूर चेन्नमा चौकात ध्वज दाखवून करण्यात आला. यावेळी अक्का पथकातील सदस्यांनी साहसी प्रात्यक्षिके सादर केली. (Akka squad for the safety of girls)
अक्का पथकात महिला पोलीस आणि एन.सी.सी. छात्रांचा समावेश असून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. १८१ आणि १०९८ या क्रमांकावर संपर्क साधून अडचणीत असलेल्या महिला आणि तरुणीना त्वरित मदत मिळणार आहे. (Akka squad for the safety of girls)
बस स्थानक, रेल्वे स्टेशन, चित्रपटगृह, बाजारपेठ, शाळा, कॉलेज परिसरात हे अक्का पथक नियमित भेट देऊन पाहणी करणार आहे. निर्जन स्थळी फिरणाऱ्या तरुण, तरुणीना देखील अक्का पथक प्रतिबंध करणार आहे. महिला, तरुणीची छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओवर देखील अक्का पथकाची नजर असणार आहे. अपघात झालेल्या ठिकाणी देखील जखमीना त्वरित उपचार मिळण्यासाठी देखील अक्का पथक मदत करणार आहे. अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांच्या मदतीने बाल विवाह रोखणे देखील अक्का पथक करणार आहे. कर्नाटक राज्यातील ३१ जिल्ह्यात आणि पाच पोलीस आयुक्तालयात अक्का पथके कार्यरत असणार आहेत.यावेळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन आणि मान्यवर उपस्थित होते. (Akka squad for the safety of girls)