Africa won the series : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ४०८ धावांनी दणदणीत विजय

Africa won the series

गुवाहटी : दक्षिण आफ्रिकेने भारतावर ४०८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठ्या धावसंख्येने पराभवाची नोंद झाली आहे. दक्षिण अफ्रिकेने मालिका २-० अशी जिंकली. २५ वर्षात भारतात पहिली कसोटी मालिका विजयाची नोंद केली. भारताच्या दारुण पराभवाला कारणीभूत ठरलेल्या अष्टपैलू मार्को जॅन्सनची सामनावीर म्हणून निवड केली. (Africa won the series)

भारतीय संघाला विजयासाठी ५४९ धावांचे आव्हान दिले होते. पण शेवटच्या दिवशी चहापानापूर्वीच भारताचा डाव १४० धावांवर संपुष्टात आला. रवींद्र जडेजाने ८७ चेंडूत ५४ धावा करत सर्वाधीक धावा केल्या. ३६ वर्षीय हार्मरने ३७ धावांत सहा गडी बाद करत कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सन याने या कसोटीत पहिल्या डावात ९३ धावा केल्या. तसेच पहिल्या डावात ४८ धावांत ६ बळी घेतले. त्याची सामनावीर म्हणून निवड झाली. एडेन मार्करामनेही या सामन्यात नऊ झेल टिपले. एका कसोटी सर्वाधीक झेल घेणारा क्षेत्ररक्षक म्हणून मार्करामची नोंद झाली आहे. (Africa won the series)

आज सकाळी शेवटच्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा हार्मरने कुलदीप यादवला पाच धावांवर बाद केले. ध्रुव जुरेल दोन तर कर्णधार ऋषभ पंतने १३ धावा केल्या. भारताची धावसंख्या ५ बाद ८५ असताना जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने डाव सावरण्याचा प्रयत्न केले. जडेजाने चार चौकार आणि दोन षटकारांसह अर्धशतक झळकावले. केशव महाराज गोलंदाजीवर तो यष्टीचीत झाला. त्यानंतर तळची फलंदाजी झटपट बाद झाली. (Africa won the series)

दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी २००० मध्ये हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली भारतावर २-० असा कसोटी विजय मिळवला होता. त्यानंतर टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली २-० अशी मालिका खिशात घालत आफ्रिकेने भारताला क्विन स्वीप केले. गतवर्षी न्यूझिलंड संघांने भारतावर ३-० असा पराभव केला होता. सलग दोन वर्षाच्या क्रिकेट हंगामात घरच्या मैदानावर फिरकी गोलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर भारतीय संघ पराभूत झाल्याने भारतीय फलंदाजांचे पितळ उघडे पडले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर