घराचा पाया खोदताना खजिना सापडला

A treasure was found in Lakundi

बेळगाव : प्रतिनिधी :  जुना वाड्यात खुदाई करताना सोन्याच्या हंडा सापडला अशी चर्चा पूर्वीची काळी ऐकायला येत असे. पण आता घर बांधताना सोन्याचा हंडा सापडला नाही पण कलश सापडल्याची घटना घडली आहे.  घर बांधण्यासाठी पाया खोदताना एका कलशात सोन्याची नाणी, दागिने आणि मूर्ती असलेला खजिना सापडला. कर्नाटक राज्यातील  बेळगाव जिल्ह्यातील गदग तालुक्यातील  लकुंडी गावात हा खजिना मिळाला आहे. (A treasure was found in Lakundi)

                         लकुंडी गावातील गंगव्वा बसवराज रित्ती यांनी आठवड्यापूर्वी जुने घर पाडण्यात आले आहे. नवीन घर बांधण्यासाठी पाया खोदत असताना त्यांना हा खजिना सापडला. एका कलशात सोन्याची नाणी, दागिने आणि मूर्ती असल्याचे आढळून आले. त्यांनी लगेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांसह  खजिना सापडलेल्या स्थळाला गदग जिल्हा पोलीस प्रमुख,तहसीलदार आणि पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.खजिना सापडल्याचे कळताच गावातील लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. हा खजिना सरकारजमा होणार का बसवराज रित्ती यांना मिळणार याची पंचक्रोशीत चर्चा सुरू होती. (A treasure was found in Lakundi)

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या