१२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका ५ फेब्रुवारीला ; मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी

The district council elections were announced today

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पाच फेब्रुवारीला मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुकवारी १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे.  ज्या महानगरपालिकेत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली नाही अशा कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. (The district council elections were announced today) राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकीची घोषणा पत्रकार परिषदेत केली. ज्या दिवशी राज्यातील २९ महानगरपालिकेचा निकाल जाहीर होणार आहे, त्याच दिवशी १६ फेब्रुवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. १६ जानेवारी ते २१ जानेवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. २२ जानेवारी उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया होणार आहे. २७ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर त्याच दिवशी साडेतीन वाजता पात्र उमेदवारांची यादी आणि चिन्ह वाटप होणार आहे. पाच फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सात फेब्रुवारी रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश या पूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूका पूर्ण झाल्या आहेत. २९ महानगरपालिकेच्या निवडणूका १५ जानेवारीला होत असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहेत. महानगरपालिका निवडणुकीसाठी सरकारी यंत्रणा गुंतल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जाणार का असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे निवडणुका घेण्यासाठी दहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढीचा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. काल सोमवारच्या सुनावणीत दोन आठवड्याची सवलत देत १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रक्रिया संपवण्यास सांगितले आहे. त्यामुळे आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. (The district council elections were announced today)

Related posts

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

भारताची आरोग्य व्यवस्था गंभीर