कोल्हापूर :प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदारसंघाची प्रारुप रचना जाहीर झाली. जिल्हा परिषदेच्या मतदार संघात एक गणाने वाढ झाली आहे. आता जिल्हा परिषदेचे ६८ गण असणार आहेत. यापूर्वी ६७ गण होते. तसेच पंचायत समितीसाठी १३६ गण असणार आहेत. अनेक गावांची अदलाबदल झाल्याने निवडणूकीचे गणित बदलणार असून त्यादृष्टीने राजकीय पक्षांना आखणी करावी लागणार आहे. (ZP contiruency announced)
गेल्या जिल्हा परिषद निवडणूकीनंतर हुपरी, शिरोळ, आजरा, हातकणंगले या पाच नगरपालिका आणि नगपंचायती झाल्या आहेत. यातील क्षेत्र वगळून नव्याने जिल्हा परिषद आणि पंचायत प्रभाग रचना करण्यात आली आहे.
आज जिल्हा परिषदेने प्रारुप रचना जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली. जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती घेता येणार आहेत. त्यानंतर अभिप्राय २८ जुलैला विभागीय आयुक्तांकडे पाठवतील. त्यानुसार विभागीय आयुक्ताकडे सुनावणी होऊन प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकाऱ्याकडे येईल. त्यानंतर १८ ऑगस्टला जिल्हाधिकारी हा प्रारुप रचना प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला सादर करतील. (ZP contiruency announced)
जिल्हा परिषद संघाची नावे अशी, शाहूवाडी तालुका, १. शित्तूर तर्फे वारुण, २. सरुड, ३. बांबवडे, ४. आंबार्डे,
पन्हाळा तालुका, ५.सातवे, ६.कोडोली, ७. पोर्ले तर्फे ठाणे, ८. यवलूज, ९.कोतोली, १०. कळे.
हातकणंगले तालुका, ११. घुणकी, १२, भादोले, १३. कुंभोज, १४, आळते, १५. शिरोली, १६. रुकडी, १७, रुई, १८. कोरोची, १९. कबनूर, २०. पट्टणकोडोली, २१. रेंदाळ.
शिरोळ तालुका, २२ दानोळी, २३, उदगाव, २४.आलास, २५.नांदणी, २६.यड्राव, २७ अब्दुललाट, २८. दत्तवाड.
कागल तालुका, २९, कसबा सांगाव, ३०. सिद्धनेर्ली, ३१, बोरवडे, ३२.बानगे, ३३. चिखली, ३४. कापशी.
करवीर तालुका, ३५, शिये, ३६.वडणगे, ३७. उचगाव, ३८. मुडशिंगी, ३९. गोकुळ शिरगाव, ४०. पाचगांव, ४१. कळंबे तर्फ ठाणे, ४२.पाडळी खुर्द, ४३. शिंगणापूर, ४४. सांगरुळ, ४५. सडोली खालसा, ४६. निगवे खालसा.
गगनबावडा तालुका, ४७ तिसंगी, ४८. आसळज.
राधानगरी तालुका, ४९. राशिवडे, ५०. कसबा तारळे, ५१. कसबा वाळवे, ५२, सरवडे, ५३. राधानगरी.
भुदरगड तालुका, ५४. गारगोटी, ५५, पिंपळगाव, ५६. आकुर्डे, ५७. कडगाव.
आजरा तालुका, ५८. उत्तुर, ५९. पेरणोली.
गडहिंग्लज तालुका, ६० कसबा नुल, ६१. हलकर्णी, ६२. भडगांव, ६३. गिजवणे, ६४. नेसरी.
चंदगड तालुका, ६५ अडकूर, ६६. माणगाव, ६७. कणदूर, ६८. तुडये. (ZP contiruency announced)