लंडन : क्रिकेट पंढरी समजल्या जाणारा लॉर्डस खेळपट्टीवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात शेवटच्या दिवशी भारतीय संघाच्या तळच्या फलंदाजी चिवट झुंज् दिली. इंग्लंडने भारतांवर २२ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. मोहमद सिराजला बशिरने बाद करत भारताचा दुसरा डावात १७० धावांत संपुष्टात आणला. डावखुरा रवींद्र जडेजाने ६१ धावांवर नाबाद राहिला. या विजयाने इंग्लंडने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. (India Lost)
तिसऱ्या कसोटीत रंगतदार झालेल्या सामन्यात भारताला विजयासाठी १९३ धावांचे आव्हान दिले होते. कालच्या ४ बाद ५८ धावसंख्येवर भारताने डाव सुरू केला. पण इंग्लंडच्या तिखट माऱ्यासमोर दिग्गज खेळाडूंची भंबेरी उडाली. के.एल. राहूल सोबत उतरलेल्या ऋषभ पंतने दोन चौकार ठोकले. पण एका सुरेख बॉलवर जोफ्रा आर्चरे त्याची दांडी उडवली. तो नऊ धावांवर बाद झाला. त्यानंतर भरवशाचा के.एल. राहूलला कर्णधार बेन स्टोक्सने पायचित पकडले. त्याने ५८ चेंडूत ३९ धावा केल्या. त्यामध्ये सहा चेंडू सीमापार केले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला जोफ्रा आर्चरने शून्यावर बाद केले. आर्चरने स्वत:च्या गोलंदाजीवर सुरेख झेल टिपला.
भारताची धावसंख्या ७ बाद ८२ असताना रवींद्र जडेजा आणि नितिश कुमार रेड्डीने किल्ला लढवला. दोघांची जोडी जमणार असे वाटत असताना ख्रिस वोक्सच्या आउंट स्विंगरवर यष्टीरक्षक स्मिथने त्याचा झेल टिपाला. नितिश कुमारने ५३ चेंडूत १३ धावा केल्या. भारताचे शेवटचे दोन फलंदाज बाद करुन सामना खिशात घालण्याची तयारी करत असताना जसप्रित बुमराहने रवींद्र जडेजाला साथ दिली. दोघांनी ३५ धावांची भागीदारी करत दीडशेपर्यंत धावसंख्या आणली. बेन स्टोक्सने जसप्रित बुमराहला बाद केले. तब्बल ५४ चेंडूत पाच धावा काढणाऱ्या बुमराहने एक चौकार मारला तर एक धाव पळून काढली. त्याने ४८ चेंडू खेळून काढले. त्यानंतर आलेल्या मोहमंद सिराजनेही जडेजाला साथ दिली. दोघांनी भारताची धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली. संघाला विजयासाठी २२ धावांची गरज असताना ऑफ स्पिनर बशिरने त्याला बोल्ड केले. सिराजने ३३ चेंडू खेळत ४ धावा काढल्या. जडेजा ६१ धावांवर नाबाद राहिला. जडेजाने तब्बल ३० षटके म्हणजेच १८१ चेंडू खेळून काढले. त्यामध्ये चार चौकार मारले आणि एक षटकार खेचला. (India Lost)
इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी तीन गडी बाद केले. ब्रायडन कार्सने दोन तर ख्रिस वोक्स आणि शोयब बशिरने प्रत्येकी एक गडी बाद केला. (India Lost)