करवीरनिवासिनी अंबाबाईची गजगौरी रुपातील पूजा

Worship of Karvir-nivasini Ambabai in the 'Gajagauri' form

कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी ललित पंचमीनिमित्त करवीर निवासिनी अंबाबाईची अलंकार  गजगौरी रुपातील पूजा बांधण्यात आली. आज पाचव्या दिवशी अंबाबाई पालखी कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडील टेंबलाई टेकडीवर त्र्यंबुली भेटीसाठी गेली होती. तिथे कोहळा फोडण्याचा विधी पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. (Worship of Karvir-nivasini Ambabai in the ‘Gajagauri’ form)

आजच्या दिवशी देवीचा शृंगार दुपारी बाराच्या आधीच होतो. कारण या दिवशी देवी तिच्या प्रियसखी त्र्यंबुली हिच्या भेटीसाठी निघते. कामाक्ष वध युद्धात अंबाबाईला त्र्यंबोली देवीने सहाय्य केले होते. युद्धानंतर जो सोहळा झाला होता त्या सोहळ्याला अंबाबाईने त्र्यंबुली देवीस निमंत्रण न दिल्याने ती रुसुन बसली होती.  त्र्यंबुली देवीचा रुसवा काढायला देवी लवाजम्यासह निघते. तिथे अंबाबाई आणि त्र्यंबुली देवीची भेट होते. तिथे कोल्हासूर वधाचे प्रतीक म्हणून त्र्यंबुली मंदिरात दारात कोहळ्याचा भेद केला जातो. (Worship of Karvir-nivasini Ambabai in the ‘Gajagauri’ form)

अंबाबाई त्र्यंबुलीचे दर्शनाकरिता निघालेल्या स्वरूपात पूजा बांधण्यात आली होती. अंबाबाई हत्तीच्या अंबारीत बसली असून पुढे लवाजमा आहे अशा रुपातील पूजा मांडण्यात आली होती. गजगौरी रुपातील अलंकार पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज दुपारी टेंबलाई टेकडीवर कोहळा फोडण्याचा विधी झाला. युवराज संभाजीराजे छत्रपतीच्या हस्ते कोहळा फोडण्यात आला. यावेळी युवराज मालोजीराजे छत्रपती, यौराजे शहाजी राजे, यश राजे उपस्थित होते. फोडलेला कोहळ्याचा प्रसाद करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. टेंबलाई टेकडीवर जत्रा भरली होती. (Worship of Karvir-nivasini Ambabai in the ‘Gajagauri’ form)

Related posts

गोकुळमध्ये सतेज पाटलांनी विरोधकांना धुळ चारली

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार;  मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

अंबाबाईच्या जागरादिवशी  महिषासुरमर्दिनी रुपात पूजा