कोल्हापूर : प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी प्रभाग रचना करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला होता. मात्र दोन वर्षांपूर्वी कायदा बदलण्यात आला. आता हे सर्व अधिकार नगर विकास विभागाने घेतले आहेत याचाच आम्हाला आक्षेप आहे. राज्यात प्रभाग रचना करताना कोणत्याही दबावाने प्रभाग रचना करता कामा नये, राज्यातील प्रत्येक प्रभाग रचनेवर आमचं बारीक लक्ष असेल अधिकाऱ्यांनी चुकीचं आणि दबावाखाली काहीही करू नये, असा इशारा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिला. कोल्हापूरात ते पत्रकारांशी बोलत होते. (Ward formation)
अहमदाबाद विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे त्यावरून नेमकं काय घडलं याची माहिती लोकांपर्यंत यायला हवी, असे सांगून सतेज पाटील म्हणाले, विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. भारतात ही घटना झाल्यानं प्रवाशांमध्ये भारताबद्दलची विश्वासार्हता निर्माण करणे महत्त्वाचं आहे, भारतात यापुढे अशा घटना घडणार नाहीत असं चित्र जगासमोर जाणं गरजेचं आहे, या सर्व प्रकरणाकडे गांभीर्यानं बघणं गरजेचं असून कुटुंबियांना सांत्वन करणे गरजेचे आहे, फोटोसेशन करून नेमकं काय मिळणार आहे हे कळत नाही असंही आमदार सतेज पाटील म्हणाले. (Ward formation)
सतेज पाटील म्हणाले, प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल अन्न त्याग आंदोलन सुरू केला आहे याचा आजचा सातवा दिवस असून सरकार याकडे दुर्लक्ष होत आहे, या संदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या समितीला कार्यकाळ दिला आहे का माहित नाही, सरकार आलं की कर्जमाफी करू असं मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितलं होत. समिती तयार केली आहे मात्र त्याला कार्यकाळ द्यायला हवा, केवळ जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत म्हणून दिखाव्यासाठी समिती स्थापन होता कामा नये. (Ward formation)
राज्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहे यावर बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात दोन्ही ठाकरे बंधू तयार झाले आहेत, हे दोघे या राज्याच्या हितासाठी एकत्र येत असतील तर काँग्रेस म्हणून आमच्या शुभेच्छा आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असताना अनेक खंद्या शिलेदारांनी आपली साथ सोडली आहे यावर बोलताना सतेज पाटील म्हणाले, अशा अनेक अडचणी याआधी माझ्या आयुष्यात आल्या, कोण गेले, कोण आले, याचा आम्हाला फरक पडणार नाही, जो पर्यंत सामान्य जनता आमच्यासोबत आहे तोपर्यंत कोणत्याही ऑपरेशन आमच्यामध्ये येणार नाहीत, ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या ते लोकांना आवडलेलं नाही त्यामुळे सामान्य जनता आमच्या सोबत येत आहे, असेही ते म्हणाले. (Ward formation)