विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जूनला मतदान

Voting for 17 Legislative Council seats on June 18

नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. १८ जूनला मतदान होणार आहे. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्यसंख्या ७८ इतकी असून २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे निवडून जातात. पण ओबीसी आरक्षण आणि न्यायालयीन प्रक्रिया यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या. त्यामुळे आमदार कार्यकाळ संपूनही निवडणुका झाल्या नव्हता. गेल्या दोन ते अडीच वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जात असलेल्या आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. (Voting for 17 Legislative Council seats on June 18)

निवडणूकीची अधिसूचना २५ ला निघणार असून अर्ज भरण्याची शेवटची मुदत एक जून आहे. उमदेवार अर्जाची छाननी दोन जूनला होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत चार जून १८ जून रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना, नागपूर या ठिकाणी निवडणुका होणार आहेत. (Voting for 17 Legislative Council seats on June 18)

मुदत संपलेल्या आमदारांची मतदारसंघानुसार नावे अशी,

सोलापूर :  प्रशांत प्रभाकर परिचारक (१ जानेवारी २०२२).

अहमदनगर : अरुणकाका भीमराव जगताप (१ जानेवारी २०२२).

ठाणे : रवींद्र सदानंद पाठक (८ जून २०२२).

जळगाव :  चांदभाई पटेल (५ डिसेंबर २०२२).

सांगली,सातारा : मोहनराव कदम (५ डिसेंबर २०२२)

नांदेड : अमरनाथ अनंतराव राजूरकर (५ डिसेंबर २०२२).

यवतमाळ : दुष्यंत चौधरी (५ डिसेंबर २०२२).

पुणे : अनिल शिवाजीराव भोसले (५ डिसेंबर २०२२).

भंडारा, गोंदिया : डॉ. परिनय फुके (५ डिसेंबर २०२२).

रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग : अनिकेत सुनील तटकरे (३१ मे २०२४).

नाशिक : नरेंद्र दराडे (२१ जून २०२४).

वर्धा,चंद्रपूर,गडचिरोली : रामदास अंबटकर (२१ जून २०२४).

अमरावती : प्रविण पोटे (२१ जून २०२४).

उस्मानाबाद, लातूर, बीड : सुरेश रामचंद्र धस (२१ जून २०२४).

परभणी, हिंगोली : विप्लव बजोरिया (२१ जून २०२४).

Related posts

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. आर.के. कामत यांची निवड

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

राष्ट्रवादीचे प्रवक्ते विलास लवांडेंना अटक, संग्राम भंडारे मोकाट