Uddhav Thackeray speech : ‘कमॉन किल मी’ : ठाकरेंचे आव्हान

Uddhav Thackeray speech

मुंबई : प्रतिनिधी : शिवसेनेचा ब्रॅन्ड पुसुन टाकाल तर भाजपचे नामोनिशान महाराष्ट्राच्या धरतीवरुन पुसुन टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेना वाचवण्यासाठी मी छातीचा कोट करणार आहे. त्यासाठी सर्वात पुढे मी असणार आहे असे सांगत त्यांनी ‘प्रहार’ चित्रपटातील नाना पाटेकर डॉयलाग ची आठवन देऊन ‘गद्दारांना मी समोर उभा राहून सांगतो ‘कमॉन किल मी’ असे हिंमत तर या अंगावर, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले. शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनाच्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. (Uddhav Thackeray speech)

मला मारायला येणार असाल तर त्रिशुल चित्रपटातील अमिताभ बच्च्चन प्रमाणे अॅम्ब्युलन्स घेऊन या. जाताना तुम्ही सर्वजण आडवे व्हाल, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. शिवसेनेच्या मेळाव्यात ठाकरे यांनी भाजपसह केंद्रातील मंत्री आणि राज्यातील मंत्र्यावरही टीका केली.

आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे मनसे युतीबाबत काय बोलतात याकडे लक्ष लागले. मनसे युतीबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, जे जनतेच्या, राज्याच्या मनात आहे तेच होईल. पण मराठी माणसाची शक्ती एकत्र होऊ नये म्हणून मालकांचे नोकर हॉटेलमध्ये भेट घेत आहेत, अशी टीका ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केली. मुंबई शिवसेना ताब्यात येऊ यासाठी ते प्रयत्न करत आहेत पण मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकेल असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबईवर शिवसेनेची स्थापना झाली तर अदानीला मुंबई दान देण्यास अडथळा येणार असल्याने त्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले. होणार नाही, होणार नाही अशी इच्छा बाळगणाऱ्या आम्ही बघू काय करायचे असेही युतीबाबत ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray speech)

भाजप शिवसेना संपवायला बघत आहे याकडे लक्ष वेधताना त्यांनी यापूर्वी भाजपने ‘बंटेगे तो कटोंगे’ चा नारा दिला. हिंदू मुस्लीमांच्या फूट पाडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता मराठी अमराठी वाद पेटवण्यासाठी हिंदी भाषेचा सक्तीचा विषय आणला आहे. आपण हिंदी भाषेवरुन वाद करायला मोकळे झालो की सत्ताधारी भ्रष्टाचार करायला मोकळे होतात, याकडे त्यांनी उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले. (Uddhav Thackeray speech)

सुप्रिम कोर्टाने नुकतेच राज्य सरकारचे तीन कोटीचे टेंडर रद्द केले. मुंबई रस्ते घोटाळा झाला आहे. अदानींना धारावी पुनर्विकासासाठी भुखंड मोफत दिले जात आहेत. मुंद्रांक शुल्क माफ केला जात आहे. त्यासाठी आता हिंदी सक्तीचा विषय बाहेर काढून मराठी अमराठीमध्ये फूट पाडत आहेत, असा आरोप त्यांनी केला. मुंबई तुटता कामा नये अशी शपथ घेतली तर मुंबई वाचेल अन्यथा अदानीच्या घशात जाईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर