बेळगाव : प्रतिनिधी : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेला बेळगाव जिल्ह्यातील गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे धबधब्यातून पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्याने आता पर्यटकांची पावले या धबधब्याकडे आपसूकच वळतील. (Gokak Falls)
दरवर्षी चांगला पाऊस झाला की गोकाक येथील धबधबा प्रवाहित होतो, पण यावर्षी मान्सूनपूर्व पावसामुळे हा धबधबा मे महिन्यातच प्रवाहित झाला होता. गेल्या काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे धबधबा पुन्हा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. (Gokak Falls)
घटप्रभा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे नदीची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे हा धबधबा प्रवाहित झाला आहे. धबधबा १७२ फूट उंचावरून खाली कोसळतो. त्यामुळे त्यांचे तुषार दूरपर्यंत उडत राहतात. गोकाक येथील धबधब्यावर असणारा झुलता पूलही पर्यटकांचे आकर्षण आहे.