अमेरिकेचे इराणवर हल्ले ; ‘शांतता करार’ रद्द ची घोषणा

Trump's announcement of cancellation of the peace agreement

नवी दिल्ली : अमेरिकेने इराणवर ८० अधिक हवाई हल्ले केल्याने मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग जमले आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदी करार संपल्याची घोषणा केली. सध्या इराणमध्ये अमेरिका इस्त्रालय हल्ल्यात मुत्यूमुखी पडलेल्या अयातुल्ला खोमेनी यांच्यावर अंत्यसंस्काराचा विधी सुरू आहेत. अमेरिकेला प्रत्युत्तर देताना इराणनेही अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. (Trump’s announcement of cancellation of the peace agreement)

अमेरिकेकडून इराणचे ८० तळ लक्ष्य

होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केला आहे. अमेरिकन हवाई दलाने इराणमधील ८० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, रडार केंद्रे, ६० हून अधिक लढाऊ नौका, लष्कर नियंत्रण कक्षांवर हल्ले केले आहेत. लष्करी कारवाईसोबत इराणची आर्थिक नाकेबंदी करण्याचा मोठा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेने इराणला तेल विक्रीसाठी दिलेला विशेष परवाना तडकाफडकी रद्द केला आहे. त्यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Trump’s announcement of cancellation of the peace agreement)

इराणचा अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले

अमेरिकेने केलेल्या भीषण हल्ल्यानंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस् ने दिलेल्या माहितीनुसार बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकेच्या ८५ लष्करी तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागले आहेत. बहरीनमधील अमेरिकेचा पाचवा नौदल विभाग आणि कुवेतमधील अली अल सालेम हवाई तळावर हल्ला केल्याचा दावा इराणने केला आहे. अमेरिकेचे हायटेक एक्यू नाईन ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. (Trump’s announcement of cancellation of the peace agreement)

Related posts

अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

मोदी-शाहांची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढा : राज ठाकरें

दिल्ली पोलिसांनी विमानातच अभिजित दीपकेंना ताब्यात घेतले