अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

Sharadiya Navaratri festival begins at the Ambabai Temple

कोल्हापूर : प्रतिनिधी : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात अतिशय मंगलमय आणि धार्मिक वातावरणात  शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनास पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक भाविकांसह परगावचे भाविक मोठ्या संख्येने कोल्हापुरात दाखल झाले आहेत. (Sharadiya Navaratri festival begins at the Ambabai Temple)

अंबाबाई मंदिरात रविवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास मानाच्या तोफेची सलामी दिल्यानंतर घटस्थापना करण्यात आली. तत्पुर्वी पहाटे चार वाजता मंदिरात देवीचे नित्य देवपूजेचे विधी करण्यात आले. नवरात्रोत्सानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

मंदिरात आकर्षक पुष्प व फळांची सजावट

मंदिरात आकर्षक पुष्प व फळांची सजावट करण्यात आली आहे. एनर्जी इव्हेंट्सचे स्वप्निल सुभाष हिददुगी यांच्यावतीने त्यांचे वडील कै. सुभाष शिवपुत्रप्पा हिददुगी यांच्या स्मरणार्थ ही सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. देवीच्या पहिल्या दिवसाच्या रंगानुसार मंदिराच्या अंतर्गत सजावटीमध्ये प्रामुख्याने भगव्या झेंडूच्या फुलांचा वापर करण्यात आला असून, सुमारे ३,००० किलो भगवा झेंडू, शेवंती, पिवळा झेंडू आणि आंब्याच्या पानांच्या माळांनी मंदिर परिसर सजविण्यात आला आहे.मंदिराची प्रवेशद्वारे, मुख्य दर्शनद्वार, अंतर्गत खांब, दर्शनरांग आणि गरुड मंडप येथे विशेष पुष्पसजावट करण्यात आली आहे. या सजावटीमध्ये ऑर्किड्स, लिलियम्स, क्रिसॅन्थेमम, डच गुलाब, निशिगंध, डेझी, जिप्सोफिला आणि ओरिएंटल लिली यांसारख्या विविध आकर्षक फुलांचा समावेश आहे.पुष्पसजावटीसोबतच केळीची झाडे, केळीचे घड तसेच अननस, मोसंबी, चिकू, संत्री, नारंगी, पेरू आणि इतर फळांचाही सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे. सुमारे ८०० डझन विविध फळे आणि ४०० डझन केळी यांची व्यवस्था करण्यात आली आहे. (Sharadiya Navaratri festival begins at the Ambabai Temple)

शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त कार्यक्रम

दरम्यान रविवारी सायंकाळी पाच वाजता भवानी मंडपात शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होत आहे. यावेळी भवानी मंडप परिसरात शाहिरी पोवाडा,मर्दानी खेळ हे नामवंत कलावंतांकडून तर दसरा महोत्सवाबाबत अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती देणारे भाषण वक्त्याकडून सादर करण्यात येणार आहे . जिल्हा प्रशासनातर्फे ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत.सोमवारी (दि.१२) जिल्ह्यातील सर्व शाळां, महाविद्यालयांमध्ये पारंपारिक वेशभूषा हा उपक्रम घेण्यात येणार आहे. गुरुवारी महिलांची बाईक रॅली आयोजित करण्यात येणार आहे. (Sharadiya Navaratri festival begins at the Ambabai Temple)

Related posts

मोदी-शाहांची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढा : राज ठाकरें

दिल्ली पोलिसांनी विमानातच अभिजित दीपकेंना ताब्यात घेतले

गोकुळ निवडणूक चिन्ह वाटपात मुख्यमंत्री फडणवीसांचा हस्तक्षेप