मुख्यमंत्र्यांची सटकली; विरोधक ‘भाडे के टट्टू’

CM criticizes the opposition over the 'missing link' issue

मुंबई : प्रतिनिधी : मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यांतर विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना विधानसभेत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच सटकली. विधानसभेत त्यांनी टीका करणाऱ्या विरोधकांवर भाडे के ट्ट्टू अशा शब्दात टीका करत त्यांना सोडणार नाही असा इशाराही दिला.   

राज्यात पावसाने हाहा:कार माजवला आहे. विरोधक आणि सर्वसामान्यांकडून महायुती सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंक मोठी दरड कोसळली. १०० टनापेक्षा जास्त मलबा हटवून मिसिंग लिंकच्या दोन लिंक सुरू करण्यात आल्या आहेत. पण विरोधकांनी महायुती सरकारने मिसिंग लिंकचे उद्घाटन घाईघाईने केले असून या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची टीका केली. या टीकेला प्रत्युत्तंर देताना मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत रागाचा पारा चढल्याचा पहायला मिळाला. खोटं बोलणाऱ्यांना लाज वाटत नाही. जे भाडे के ट्ट्टू आहेत त्यांनी लक्षात ठेवा. मला शिव्या द्या, पण महाराष्ट्राला बदनाम कराल, तर मी सोडणार नाही असा इशाराच दिला. मुख्यमंत्र्यांची भाषणात भाषा ही चांगलीच सटकल्यासारखी होती. (CM criticizes the opposition over the ‘missing link’ issue)

हिंमत होती म्हणून कनेक्टिंग लिंक बनवला

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आघाडी सरकारच्या काळात मिसिंग लिंकचा प्रस्ताव तयार झाला होता. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी १४ कारणे देत हा प्रकल्प शक्य नसल्याचे सांगून फाईल बंद केली होती. मात्र महायुती सरकारने तज्ज्ञांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी हा प्रकल्प करणे शक्य असल्याचे सांगितल्यानंतर सरकारने मिसिंग लिंक उभारण्याचा निर्णय घेतला आणि पूर्णही करुन दाखवला. पण काही लोक असे आहेत की एकादं कोटी लोक मेल्यानंतर ते पैदा झले आहेत. खोटं बोलायला यांना लाज वाटत नाहीत. कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते टीव्हीवर येऊन खोटं बोलतात. खरं म्हणजे कनेक्टिंग लिकंचे काय झालं हे सर्वांना माहिती आहे. पण महायुती सरकारची हिंमत होती म्हणून कनेक्टिंग लिंक बांधून दाखवला, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. (CM criticizes the opposition over the ‘missing link’ issue)

मला शिव्या द्या, महाराष्ट्राला बदनाम करु नका

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, १८ तासात कनेक्टिंग लिंक पुन्हा वाहतूक सुरू झाली ती पण टीकाकारांच्या थोबाडावर टिच्चून. प्रश्न हा नाही की तुम्ही मला शिव्या देता. तुम्ही देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, शिव्या प्रुफ आहे मी. जीवनात एकच गोष्ट शिकलो मी. आजपासून १० वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाहीत. मात्र ती केनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदेंचे नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टी आहे की मला बदनाम करा. महाराष्ट्राला बदनाम करु नका. ज्यांना कुत्रे नाही विचारत. ते आज सोशल मिडियावर येऊन मला शिव्या देत आहेत. असे काही भाड्याचे टट्टू मिसिंग लिंकबाबत सोशल मिडियावर पैसे घेऊन लिहित होते. त्यांना पण सांगू इच्छितो की, महाराष्ट्राचा अपमान कराल तर सोडणार नाही. असा इशाराच फडणवीसांनी दिला. (CM criticizes the opposition over the ‘missing link’ issue)

Related posts

कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा

सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना धमकी देणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही

मुख्यमंत्र्याकडून कोल्हापुरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय अहवाल करण्याच्या सूचना