Trump imposes additional 25 percent tariff : ट्रम्पकडून भारतावर अतिरिक्त २५ टक्के टेरिफ

Trump imposes additional 25 percent tariff

नवी दिल्ली : चोवीस तासात आता भारतावर अतिरिक्त कर लादणार अशी धमकी देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली धमकी खरी करुन दाखवली. ट्रम्प यांनी भारतावर आणखीन २५ टक्के टेरिफ लावले आहे. यापूर्वी त्यांनी २५ टक्के टेरिफ लावला होता. त्यामुळे आता भारतीय उत्पादनांवर ५० टक्के कर लावण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या घोषणेमुळे भारतीय उद्योगक्षेत्र आणि शेअर बाजारावर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. भारत आणि अमेरिका व्यापार करारात आलेली कटुता केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कशी कमी करणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे. (Trump imposes additional 25 percent tariff)

अमेरिका आणि भारतामध्ये गेल्या काही दिवसापासून व्यापारी तणाव दिसून येत आहे. यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाने भारतावर रशियन तेल खरेदी केल्याचा आरोप केला होता. अशातच ट्रम्प यांनी मंगळवारी सोशल मीडियाद्वारे इशारा दिला होता की, २४ तासांच्या आत भारतावर अतिरिक्त कर लादण्यात येईल. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी आज बुधवारी  भारतावर २५ टक्के अतिरिक्त टेरिफ कर लावला आहे. त्यामुळे आता भारतावर एकूण ५०  टक्के कर लादण्यात आला आहे. (Trump imposes additional 25 percent tariff)

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर, अनेक युरोपीय देशांनी रशियासोबतच्या व्यापारावर बहिष्कार टाकला होता. अमेरिका आणि युरोपीय देशांनी सुद्धा रशियन तेलावर बंदी घातली होती. मात्र भारत आणि चीन सारख्या आशियाई देशांनी रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केले होते. महत्त्वाचे म्हणजे भारत अजूनही रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे. याचपार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत भारताला इशारा दिला होता की, जर भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली तर कर आणखी वाढवला जाईल. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ टक्के अतिरिक्त कर वाढवला आहे. (Trump imposes additional 25 percent tariff)

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला अतिरक्त २५ टक्के कर येत्या २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. असे असले तरी २७ ऑगस्टपूर्वी भारतातून निघालेल्या आणि १७ सप्टेंबर २०२५ पूर्वी अमेरिकेत पोहचलेल्या वस्तूंवर हा अतिरिक्त कर लादला जाणार नाही. विशेष म्हणजे हा अतिरिक्त कर इतर सर्व शुल्क आणि करांव्यतिरिक्त असणार आहे. मात्र काही विशेष प्रकरणांमध्ये यात सूट दिली जाण्याची शक्यता आहे. (Trump imposes additional 25 percent tariff)

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या