कोण होतास तू, काय झालास तू…. भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणाखाली घेतलेस तू..

Thackeray criticizes Fadnavis in Nagpur

नागपूर : प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपुरात आज आगमन झाल्यावर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर गप्प बसल्याचा आरोप करत “कोण होतास तू, काय झालास तू, एवढ्या सगळया भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणाखाली घेतलेस तू ”, अशी चारोळी सादर केली. ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली. नागपुरात ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. (Thackeray criticizes Fadnavis in Nagpur)

मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन यांना पदावरुन हटवण्यासाठी तामिळनाडूतील सत्ताधारी डीएमके पक्षाने महाभियोग आणण्याची तयारी केली आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटानेही सहमती दर्शवली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकेवर टीका करताना लोकसभेत अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना काहीच कळेना? अशी टीका केली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वर पोस्ट करुन “कोण होतास तू, काय झालास तू” अशी टीका केली आहे.

फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नागपूरमधील पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर टीका करण्याची संधी साधली. रोज कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचा भ्रष्टाचार उघडकीस येत आहे. त्यांचे व्हिडिओ, फोटो बाहेर येत आहेत. तरीही मुख्यमंत्री ढिम्मच आहेत. मुख्यमंत्र्यांनी आता नवीन खाते बनवावे आणि त्याला पांघरुन खाते मंत्री असे नाव द्यावे. म्हणजे बाकीचे मंत्री पांघरुन पाहून हात पाय पसरतील. मला मुख्यमंत्र्याची दया येत असे सांगून ठाकरे यांनी “कोण होतास तू, काय झालास तू, एवढ्या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणाखाली घेतलेस तू, कोण होतास तू, काय झालास तू” अशी चारोळी सादर करत मुख्यमंत्र्यावर निशाना साधला. (Thackeray criticizes Fadnavis in Nagpur)

अमित शहा यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये अशी टीका करत ठाकरे यांनी गोमांस खाणाऱ्या किरण रिजजू यांच्यासोबत जेवण करणाऱ्या अमित शहा यांनी रिजजू यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्याची हिंमत दाखवावी असे आव्हान दिले. असंवैधानिक असलेले उपमुख्यमंत्री पद दोघांना दिले जाते मग विरोधी पक्षनेतेपद देण्यास महायुती सरकार का घाबरते?  असा सवालही केला. (Thackeray criticizes Fadnavis in Nagpur)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर