सात महानगरपालिकेत ठाकरे बंधू साथ-साथ

Thackeray brothers together in municipal corporations

मुंबई : प्रतिनिधी : आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज्यातील सात महानगरपालिकेत ठाकरे बंधू युती करणार आहेत. उद्या दुपारी बारा वाजता शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वरळी येथील हॉटेल सी ब्ल्यू येथे अधिकृत घोषणा होणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. (Thackeray brothers together in municipal corporations)

खासदार संजय राऊत यांनी शिवसेना मनसे युतीची अधिकृत माहिती बुधवारी दुपारी बारा वाजता होणार असल्याचे एक्स पोस्टवर जाहीर केले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्रित पत्रकार परिषदेत संवाद साधणार आहेत. मुंबईत शिवसेना आणि मनसेची जागा वाटप जवळजवळ निश्चित झाले आहे. दोन्ही पक्ष किती जागा लढवतील हे उद्या स्पष्ट होणार शक्यता आहे. या युतीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सहभागी होईल का हे स्पष्ट होईल. (Thackeray brothers together in municipal corporations)

मुंबईसह किती महानगरपालिकांवर ठाकरे बंधू एकत्र लढणार? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, आम्ही आता अशी चर्चा करत आहोत की, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासंदर्भात स्थानिक पातळीवर चर्चा दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जवळजवळ संपल्या आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले. (Thackeray brothers together in municipal corporations)

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या