Swabhimani  : ‘स्वाभिमानी’ कडून उसाला ३७५१ रुपये दर देण्याची कारखान्याकडे मागणी

Swabhimani

जयसिंगपूर : प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आगामी गळीत हंगामात उसाला प्रतिटन पहिली उचल विनाकपात ३७५१ रुपये देण्याची मागणी साखर कारखान्यांना केली आहे. संघटनेच्यावतीने  दत्त सहकार साखर कारखाना , गुरूदत्त शुगर्स , पंचगंगा सहकारी साखर कारखाना ,शाहू सहकारी साखर कारखान्यासह जिल्ह्यातील कारखान्यांना निवेदन देण्यात आले. (Swabhimani)

साखर कारखान्याचा गळीत हंगाम तोंडावर आलेला आहे. गेल्या वर्षभरात साखर व उपपदार्थांना चांगला दर मिळालेला  आहे. वर्षभरातील साखरेची सरासरी काढल्यास ३८०० रूपये क्विंटलने विक्री झालेली आहे. इथेनॅाल , बगॅस , मोलॅसिस , प्रेसमड , अल्कोहोल यासह इतर उपपदार्थांनाही चांगला भाव मिळाला असून गेल्या वर्षभरात भाव स्थिर होते. यामुळे गत हंगामातील तुटलेल्या ऊसाला प्रतिटन २०० रूपये दुसरा हप्ता व चालू गळीत हंगामातील पहिली ऊचल विनाकपात ३७५१ रूपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सर्व कारखान्यांकडे करण्यात आली. (Swabhimani)

           ऊस उत्पादक शेतक-यांना गेल्या चार ते पाच वर्षात तीन हजार ते ३१०० पर्यंत मिळाले आहेत. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने वाढविलेल्या एफ. आर. पी. चे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणताच लाभ झालेला नाही. साखर व उपपदार्थ विक्रीतून आलेल्या पैशामधून साखर कारखान्यांचा प्रक्रिया खर्च, तोडणी वाहतूक व व्याजाची रक्कम वजा जाता अजूनही कारखान्यांकडे पैसे शिल्लक राहिले असून प्रतिटन २०० रूपयाचा दुसरा हप्ता देणे सहज शक्य आहे. त्याबरोबरच चालू गळीत हंगामामध्ये ३७५१ रूपये दर देणे सहज शक्य आहे.

             वास्तिवक पाहता २५ किलोमीटर परिघामध्ये कारखान्यास मुबलक ऊस असल्यानेच कारखान्यास वाढीव गाळपास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे आपल्या कारखान्याने २५ किलोमीटर करिता असणारी प्रतिटन ७५० रूपये तोडणी वाहतूक इतकीच कपात करणे गरजेचे आहे. आपल्या कारखान्याकडून कार्यक्षेत्राबाहेरील ५० ते १०० किलोमीटर अंतरावरून ऊस वाहतूक करून लुबाडणूक केली जात आहे व वाढीव तोडणी वाहतुकीचा प्रतिटन १०० रूपयापासून ते ३०० रूपयाचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांवर पडू लागला आहे. यामुळे यावर्षी २५ किलोमीटरचीच तोडणी वाहतूक कारखान्याकडून कपात करण्याची मागणी स्वाभिमानीकडून करण्यात आली आहे. आज जिल्ह्यातील दत्त , गुरूदत्त , पंचगंगा ,शाहू यासह जिल्ह्यातील कारखान्यांना निवेदन देण्यात आले.  स्वाभिमानीच्यावतीने शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याचे गणपतराव पाटील यांना निवेदन देण्यात आले. (Swabhimani)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर