पाटणा : दीपावलीचा मुहुर्त साधत लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने (राजद) १४३ उमेदवारांची घोषणा केली. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले तेजस्वी यादव राघोपूर विधानसभा मतदार संघातून लढणार आहे. जागा वाटपाचा घोळ असताना राजदने १४३, काँग्रेसने ६१ तर सीपीआय २० जागा लढवणार आहे. काही जागा मुकेश सहाणी यांच्या व्हीआयपी पक्षाला देण्यात येणार आहे. राजद, काँग्रेस आणि कम्युनिस्ट एकत्र लढणार असले काही जागांवर काँग्रेस विरुद्ध राजद, काँग्रेस विरुद्ध सीपीएम अशा मैत्रीपूर्ण लढतही होणार आहे. (RJD candidates announced)
दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणूकीत पहिल्या टप्प्यात सहा नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून त्यादिवशी बिहार विधानसभेचे चित्र स्पष्ट होणार आहे.
बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या राजदने १४३ उमेदवारांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये बिहारीगंजमधून रेणु कुशवाह, वारसालीगंजमधून अनिता देवो महतो, हसनपूरमधून माला पुष्पम, मधुबनमधून संध्या राणी कुशवाह, इमामगंजमधून रितू प्रिया चौधरी, बाराछत्तीमधून तनुश्री मांझी, बनियापूरमधून चांदणी देवी यांचा समावेश आहे. (RJD candidates announced)
राजदचे एम-वाय समीकरणावर लक्ष केंद्रीत
बिहारची निवडणूक जातीय समीकरणावर होत असल्याने आरजीडीने मुस्लीम-यादव म्हणजेच एम-वाय समीकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे. या समुदायांना ५० हून अधिक तिकीटे वाटप केली आहेत. तसेच २३ महिलांना तिकीट वाटप करुन महिलांना राजदकडे महिलांची मते वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुंड राजकारणी म्हणून ओळख असलेल्या राजद खासदार मोहम्मद शहाबुद्दीन याच्या मुलाला सिवानच्या रघुनाथपूरमधून उमेदवारी दिली आहे. अनेक विदयमान आणि निष्ठावंताना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
तेज प्रताप यादव यांचा सवतासुभा
लालूप्रतापसिंह यादव यांचा थोरला मुलगा तेज प्रताप यादव यांनी कुटुंबाशी सवतासुभा करताना जनशक्ती जनता दल पक्षाची स्थापना केली आहे. लालूंनी आपल्या मुलाची पक्षातून हकालपट्टी केली आहे. राजदचा बालेकिल्ला असलेल्या महुआ मतदार संघातून तेज प्रताप निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. कौटुंबिक कलहामुळे आधीच तणावपूर्ण असलेल्या निवडणुकीत नाट्यमयता निर्माण झाली आहे. (RJD candidates announced)