Suspect’s suicide : लिव्ह इन रिलेशनशीप खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताची आत्महत्या

Suspect's suicide

कोल्हापूर : प्रतिनिधी : लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरणातील युवतीचा खून करणाऱ्या संशयिताने गळफास लावून आत्महत्या केली. सतीश मारुती यादव (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर, मुळ गाव पेंद्रेवाडी, उंड्री, ता पन्हाळा) असे नाव आहे. शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे कातळापुडी येथे त्याचा आज गुरुवारी मृतदेह आढळून आला. (Suspect’s suicide)

लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या समीक्षा भारत नरसिंगे (वय २३ रा. भवानी गल्ली, कसबा बावडा, कोल्हापूर) हिचा सतीश यादव याने चाकूने भोसकून खून केला होता. विवाहाला नकार देत असल्याच्या कारणावरुन सतीश यादव याने हे कृत्य केले होते. ही घटना मंगळवारी दुपारी करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे झाली होती. समीक्षावर हल्ला केल्यानंतर सतीश यादव  पळून गेला. गांधीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस सतीश यादव याचा शोध घेत होते. पोलिसांनी यादव याच्या शिवाजी पेठ आणि पेंद्रेवाडी येथील घरावर छापे टाकले होते आज  गुरुवारी त्याचा माळापुडे येथे गळफास लावून घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. (Suspect’s suicide)

समीक्षा नरसिंगे ही विवाहित असून तिने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला होता. ती आईसमवेत रहात होती. सतीश यादव, समीक्षा नरसिंग आणि तिची आणखी एक मैत्रीण इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होते. सरनोबतवाडी येथील सतीश यादव, समीक्षा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होती. सतीश यादव समीक्षाकडे विवाह करण्यासाठी सातत्याने मागणी करत होता पण तिने नकार दिला होता. त्यामुळे चिडलेल्या सतीशने समीक्षाचा चाकूने भोसकून खून केला. खूनानंतर तो पसार झाला होता. त्याचा मोबाईलही बंद होता.  (Suspect’s suicide)

Related posts

फडणवीसांचे चॅलेंज सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदेंनी स्वीकारले

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर

सरकारने एफआयआर घ्यायला का नकार दिला?;  सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना  सवाल