सुप्रिया सुळेंचे विधान संतापजनक : हर्षवर्धन सपकाळ  

Supriya Sule's statement is outrageous

जमीर काझी : मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा वारसा चालवत आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान दिशाभूल करणारे, चिड व संताप आणणारे आहे. डॉ. दाभोलकर व  फडवणीसांची तुलना होऊच शकत नाही, दोघांच्या विचाराचा वारसा व मार्ग भिन्न आहेत, असे स्पष्ट करून खासदार सुळे यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे, असे आवाहन  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

 सुप्रिया सुळे यांच्या विधानाचा समाचार घेत ते म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंद्धश्रद्धेचे निर्मुलन व्हावे, समाज जाणता व्हावा यासाठी आयुष्य खर्ची घातले व ते कार्य करत असतानाच ते शहीद झाले. दाभोलकरांचा वारसा हा शिव, शाहु, फुले, आंबेडकरांचा, अंधश्रद्धा निर्मुलनाचा, सत्य व अहिंसेचा आहे, वारकरी संप्रदायाला पुढे घेऊन जाणारा आहे. तर देवेंद्र फडणवीसांचा मार्ग हा अंधश्रद्धेकडे घेऊन जाणारा आहे, पुरोगामी विचाराला बाजूला ठेवून प्रतिगामी विचाराला चालना देणारा आहे, अंधश्रद्धेच्या खाईत ढकलणारा, भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारा आहे, दोघांचा मार्ग एक असूच शकत नाही. ज्यांनी शिवाजी महाराजांचा वारसा नाकारला, तुकारामांच्या गाथा बुडवल्या, त्यांचे वैचारिक वारसादार फडणवीस आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विरोध करणारा वारसा फडणवीस पुढे घेऊन जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काळाराम मंदिरात प्रवेश नाकारणाऱ्यांचा वारसा त्यांचा आहे. संविधान गुंडाळून ‘बंच ऑफ थॉट’ चा संघाचा वारसा पुढे घेऊन जाणारा विचार फडणवीस यांचा आहे. (Supriya Sule’s statement is outrageous)

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, डॉ. दाभोलकर हे मला भावासारखे आहेत, अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याच्या मसुदा समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील होते तर मी त्या समितीचा सदस्य होतो. खासदार सुप्रिया सुळे यांनी  त्यांचे वडील शरद पवार यांच्या पुरोगामी विचाराचा तसेच ज्य़ेष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या विचाराचा वारसा लाभलेला आहे, याची जाणीव व भान त्यांनी ठेवावे. सुप्रिया सुळे चोर व सन्यासी दोघांना एकत्र दाखवत आहेत,  त्यांनी खुलासा करून विधान मागे,असे आवाहन  सपकाळ यांनी केले आहे. (Supriya Sule’s statement is outrageous)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर