सुनेत्रा पवारांचा शनिवारी शपथविधी

Sunetra Pawar's swearing-in ceremony on Saturday

मुंबई : प्रतिनिधी : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत. त्या राज्यातील पहिल्या उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. शनिवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी दोन विधीमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख ठरवण्यासाठी बैठक होणार असून त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच विधीमंडळाचा नेता म्हणून त्यांची निवड होणार असून सायंकाळी पाच वाजता त्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेणार आहेत. आज दिवसभर वेगवान घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शनिवारी विधीमंडळाचा गटनेतेपदासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्या शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी सकाळी मुंबईला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान शुक्रवारी दुपारी या संदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची उद्या शनिवारी बैठक होणार असून त्यामध्ये सुनेत्रा पवार यांचे नाव विधीमंडळात गटनेता म्हणून अंतिम करण्यात आली आहे. याबाबत प्रफुल् पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. (Sunetra Pawar’s swearing-in ceremony on Saturday)

अजित पवार यांच्या निधनाने सर्वांची झोप उडाली आहे. पण शेवटी शो मस्ट गो ऑफ असे म्हणतात. त्यामुळे पक्षाची जबाबदारी कोणाला तरी द्यावीच लागणार आहे. विधीमंडळातील नेत्यांनी बैठक बोलावली आहे. लोकांची अशी मागणी आहे की सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षप्रमुखपद देण्यात यावे अशी मागणी आहे. हा निर्णय विधीमंडळाच्या सदस्यांमध्ये होईल. सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर उद्याच त्याचा शपथविधी होऊ शकतो, असे सूचक वक्तव्यही भुजबळांनी केले. (Sunetra Pawar’s swearing-in ceremony on Saturday)

दरम्यान अजित पवार यांच्याकडील खाती राष्ट्रवादीकडेच देण्यात यावी अशी विनंती राष्ट्रवादीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. काल शुक्रवारी रात्री प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांची भेट घेतली. आज शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यानंतर भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांबाबत वक्तव्य केल्याने उद्या शनिवारी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Sunetra Pawar’s swearing-in ceremony on Saturday)

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या