Sule visits the victim’s family : राज्य सरकाकडून गलिच्छ विधान केली जात आहेत : खासदार सुळे

Sule visits the victim's family

बीड : प्रतिनिधी : महायुती सरकारने राजकारण बाजूला ठेऊन डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. या प्रकरणात राज्य सरकारकडून अतिशय असंवेदनशील  असून त्यांच्याकडून गलिच्छ विधाने केली जात आहेत. हे अतिशय दुर्देर्वी आणि अस्वस्थ करणारी बाब आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (Sule visits the victim’s family)

फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्य प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सोमवारी पडित महिलेच्या कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महायुती सरकार या प्रकरणात असंवेदनशील असून राजकारण बाजूला ठेऊन न्याय मिळाला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या “या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, या प्रकरणात कोणालाही क्लिनचीट देऊ नका,” असे म्हणत त्यांनी हात जोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली. तसेच, या प्रकरणी महिला डॉक्टरचे सीडीआर रिपोर्ट लिक झालाच कसा? असा थेट सवाल त्यांनी यावेळी केला. काही निवडक लोकांनाच सीडीआर रिपोर्ट मिळाला आहे. त्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकरणी आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणारचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. (Sule visits the victim’s family)

खासदार सुळे म्हणाल्या, “महायुती सरकारने राजकारण बाजूला ठेवून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. सरकारकडून अतिशय असंवेदनशील आणि गलिच्छ विधाने केली जात आहेत. हे अतिशय दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी बाब आहे. कारण ती महाराष्ट्राची एक कर्तुत्ववान लेक आहे. या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे. निवृत्त सरन्यायाधीशांकडे एसआयटीची जबाबदारी द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, राजकीय हस्तक्षेपाशिवाय कुटुंबाला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, त्यासाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू, असेही त्या म्हणाल्या. (Sule visits the victim’s family)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर