सुप्रिया सुळेंनी केला फडणवीसांवर पलटवार

Sule criticizes Fadnavis.

पुणे : प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी दिलेल्या आश्वासनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवली होती. फडणवीसांच्या खिल्लीचा समाचार घेताना खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांनी यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देत पलटवार केला. (Sule criticizes Fadnavis)

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत करण्याचे आश्वासन दिले. या घोषणेची खिल्ली उडवताना मुख्यमंत्री फडणवीसांनी मी देखील पुण्यातून उड्डाण करणाऱ्या विमानांमधून महिलांना तिकीट माफ करण्याची घोषणा करणार होतो. घोषणा करायला आपल्या बापाचं काय जात असे म्हणून अजित पवारांची घोषणा केवळ आश्वासन असल्याचे स्पष्ट केले. (Sule criticizes Fadnavis)

फडणवीसांनी उडवलेल्या खिल्लीनंतर सुप्रिया सुळे यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यावर सर्वसामान्यांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे अजून काहीच झाले नाही याची आठवण सुप्रिया सुळे यांनी करुन दिली. तसेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. ती कर्जमाफी अजुनही झालेली नाही अशी टीका करत आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते अशी आठवण करुन देत सुळेंनी फणवीसांवर पलटवार केला.  (Sule criticizes Fadnavis)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर