बलवान, सुसंकृत महाराष्ट्र उधवस्त करणाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा

Shivshakti rally of the Thackeray brothers in Mumbai

मुंबई : प्रतिनिधी :  बलवान, सुसंकृत महाराष्ट्र उधवस्त करण्याऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले. तर राष्ट्रप्रथम म्हणणारा भ्रष्टाचार प्रथम झाला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केले. रक्त सांडून मिळवून दिलेली मुंबई तुटू देणार नाही, विकू देणार नाही, झुकू देणार नाही निर्धारही उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे, मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवशक्ती सभेत दोघां बंधूनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपला मुंबई दाखवली ती शिवसेनेने दाखवली. गद्दारांना मंत्री मी केले. तरीही हे विचारतात मुंबईसाठी तुम्ही काय केले असा प्रश्न विचारतात. भाजपला एका वर्षात ३१०० कोटी रुपये निधी मिळाला. मुंबईची थकबाकी ११ हजार कोटी आहे. भाजपचे तिजोरी भरते आहे पण मुंबईची तिजोरी भरत नाही हे कसं काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. वाघ म्हणायचे जगायचे असेल तर आमच्यात या. शेळी म्हणून जगायचे असेल तर भाजपात जा अशी शब्दात खिल्ली उडवली आहे. भाजपला आलेली सूज आहे. हा माज छत्रपती शिवाजी महाराज होते शक्य नव्हेत. मावळा होणेही शक्य नव्हते. पण याच शिवाजी महाराजांच्या भूमीत आपल्याकडे शस्त्र आले आहे. इतिहासात नोंद कशी झाली आहे हे ठरवायचे आहे. हात जोडून विनंती आहे. वेळ आली आहे आता हाताची घडी सोडा, तुतारी घ्या, विजयाची ततारी फुका असे आवाहन केले. (Shivshakti rally of the Thackeray brothers in Mumbai)

उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही अस्सल मराठी बोलणारे हिंदू आहोत. भावकी एक झाली आहे आता गावकी एक झाली आहे. लाचार माकडे कधी वाघ बनू शकणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली. मराठी आणि मातृभाषेचे प्रेम रक्तात असावे लागते. मराठीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही दोघां भावांनी मराठी, हिंदूसाठी मतभेद गाढून टाकले आहेत. हिंदू मुस्लीम, मराठी अमराठी हे वाद घेऊन प्रत्येक निवडणूकीत सत्ताधारी घेऊन येतात. सत्ताधारी फक्त सर्वांना भांडवत ठेवतात. संयुक्त महाराष्ट्रात जनसंघ कधी नव्हता. आगी लावून अंगावर सोडायचे आणि आपल्या पोळ्या भाजून घेतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत गोळीला आम्ही होतो. आणि हे पोळीला होते. त्या लढयात शाहीर अमर शेख होता. सत्ताधाऱ्यांचा मुंबईचे बॉम्बे करयाचा डाव आहे का अशी शंकाही ठाकरे यांनी व्यक्त केली.

आजही सोन्यासारखी मुंबई ९२ हजार कोटींच्या ठेवी ७० कोटीपर्यंत आणल्या आहेत. तीन लाख कोटींचा घोटाळा भाजप सरकारने केल आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. आम्हाला महानगरपालिका का पाहिजे हे आम्ही सांगतो. पण भाजपला महानगरपालिका अदानीच्या घशात घालायसाठी पाहिजे आहे, असे आरोप उद्धव ठाकरेंनी केला. संपूर्ण मुंबई खोदून ठेवली आहे. विकास कामासाठी ५० टक्के सिमेंट अदानीच्या कारखान्यातून आणली आहे. (Shivshakti rally of the Thackeray brothers in Mumbai)

भाजपचे हे आक्रमण हे परतावून लावण्यासाठी आम्ही पुढे आलो आहोत, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्हाला मेहबुबा मुक्ती चालते, नीतीशकुमार चालतात, चंद्राबाबू चालतात पण शिवसेना चालत नाही. कारण शिवसेना तुम्हाला मुंबई गिळू देणार नाहीत. शिवसेना आणि शरद पवार ही दोन नावे पुसली तर मराठी माणूस उभा राहणार नाही असे त्यांना वाटते. आम्ही युती कोणाचे हिसकावून घेण्यासाठी केलेला नाही तर आमच्यावर दादागिरी करणाऱ्याच्या विरोधात एकत्र आलो आहे. मराठ्यांना लागणाऱ्या दुहीच्या शापाला गाडून टाकण्यासाठी आपण शपथ घेऊया, असे आवाहनही त्यांनी केले. (Shivshakti rally of the Thackeray brothers in Mumbai)

राज ठाकरे यांनी उद्योगपती गौतम अदानीवर टीका करताना ते भारत, महाराष्ट्र आणि मुंबई कशी गिळंकृत केली जात आहे याचे सविस्तर विवेचन केले.  ते म्हणाले वीस वर्षानंतर पहिल्यांदा आम्ही युती करतोय. तिकीट वाटपात काही नाराज झाले. त्यांना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आपलेच आहेत, ते परत येतील अशी आशा वाटते असे म्हणाले. मुंबईवर आलेले संकट त्यासाठी आम्ही दोघे एकत्र आलो आहोत. या सरकारने हिंदी सक्तीचा विषय आणलो. आम्ही दोघेही कडाडलो. हिंदी सक्ती हा चाचपडण्याचा विषय होता. २०२४ याच्यानंतर सरकारला फेफरं आले. जे मनाला येईल ते करायला लागलेत. इतकी वर्षे मी राजकारण बघत होते. कॉग्रेसही होती. पण ते जनतेला घाबरुन होते. आता जनतेला गृहित धरले आहे. त्यांच्याकडे कुठुन मते, कशी येतात याचा लढा सुरू आहे. अकोट एमआयमबरोबर युती केली. बदलापुरात काँग्रेसबरोबर युती केली. ६७ ठिकाणी बिनविरोधात निवडणूक झाली. हे आकडे पुढे वाढत जाणार आहे. या लोकांना माहित झाले आहे की आपण लोकांना विकत घेऊ शकतो. तुळजापुरात ड्रग्ज रॅकेटवाल्यांला तिकीट दिले. बदलापुरात बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी आपटेला स्वीकृत नगरसेवक केले. यांना ही हिंमत आली कुठे येते. निवडणूक जिंकण्याचे यंत्र आणि तंत्र येते तेव्हा यांना माज येतो, अशा शब्दात त्यांनी टीका  

राज ठाकरेंनी गौतम अदानीवर टीका करताना केंद्र सरकारवर टीका केली. अख्खी मुंबई विकायला काढली. देश विकायला काढली. २०१४ गौतम अदानीचे किती प्रोजेक्ट होते. २०२५ गौतम अदानी सरकारच्या आशिर्वादाने दहा वर्षात इतका श्रीमंत झाला. एका व्यक्तीवर मेहरबानी झाली आहे. वीज, सिमेंट, विमानतळ, पोर्टस् दिली आहेत. महाराष्ट्रात २०१४ पूर्वी अदानींचे एक दोन उद्योग होते. एमएमआरडीमध्ये अदानी उद्योग समुहाला मिळालेल्या प्रकल्पाची यादीच राज ठाकरेंनी वाचून दाखवली. मुंबईतील विमानतळ नवी मुंबई विमानतळाला हलवून इथली जमीन विकायला काढणार असा आरोप ठाकरेंनी केला.

 राज ठाकरे म्हणाले, मुंबई गुजरातला जोडायची असेल तर पालघर जिल्हा ताब्यात घ्यायचा. एमएमआरडी ताब्यात घेऊन लाँग टर्म प्रोजेक्ट राबवले जात आहेत याकडे त्यांनी वेधले. केंद्र, राज्य ताब्यात आहे. मुंबई त्यांना हातात पाहिजे आहे की त्याना जमिनी विक्रीसाठी त्यांना मुंबई पाहिजे हवी. बलवान, सुसंकृत महाराष्ट उधवस्त करण्याचे प्रयत्न करत आहेत. आम्हाला सांगतात निघून जा म्हणून सांगतात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत गुजरात धनिक विरोधात होते. आजही तेच चालले आहे. जमिनी विकत घेतली जात आहे. बुलेट ट्रेन अहमदाबाद नेली जात आहे. तिथून एक नवीन सिटी उभी केली जात आहेत. गुजरात मधल्या लोकांना घरे मिळणार आपल्याला मिळणार नाही. तुम्हालाच घरे मिळणार नसतील तर महानगरपालिका चाटायच्या आहेत का असा सवाल केला. ही निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची आहे. इतर पक्षातील मराठी लोकांना माझे म्हणणे आहे या महाराष्ट्र मुंबईसाठी एक व्हा. सत्ताधारांच्या माज उतरावयाचा आहे. ईव्हीएमवर लक्ष ठेवा. दुबार मतदारांवर लक्ष ठेवा. आता खरी लढाई त्यांच्याशी आहे. आपण भांडत रहावे हेच त्यांना वाटते. सतर्क रहा, बेसावध राहू नका. दुबार मतदार आला तर सकाळी सात वाजता त्याला फोडून काढा, असा आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.  

राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी अदित्य ठाकरेंचे मुंबईची नस आणि नस त्यांना माहित आहे अशा शब्दात कौतुक केले. आज निवडणूक लढवण्यासाठी मुंबईत भावकी एक झाली आहे. उद्धव आणि राज एकत्र आल्याने लोकांना प्रचंड आनंद झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्र दोन्ही भावांकडे पहात आहेत. बाळासाहेब असताना हेच मैदान तेज आज आहे.  आज मात्र काही गद्दार आहेत. काही शत्रू आहेत. हे मैदान स्वाभिमान, अभिमान, भावनेची नाळ जुळणारे हे मैदान आहेत. साडेतीनशे वर्षापूर्वी सुरत लुटल्याचा राग काहींच्या मनात आहे. त्यासाठी देशभरातून लोक आणले आहेत. मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर