Spine surgery:  ‘डीवाय’मध्ये मणक्यावरील शस्त्रक्रियेचे शतक

Spine surgery

कोल्हापूर : प्रतिनिधी : डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे अस्थिरोग विभागाच्यावतीने दहा रुग्णांवर मणक्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. द स्पाईन फाऊंडेशन, मुंबईच्या सहकार्याने या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या उपक्रमातंर्गत करण्यात आलेल्या मणक्याच्या अतिशय गुंतागुंतीच्या मोफत शस्त्रक्रियांची संख्या शंभरवर पोहोचल्याची माहिती  ‘द स्पाईन फाऊंडेशन’चे प्रमुख, ख्यातनाम स्पाइन सर्जन डॉ. शेखर भोजराज आणि हॉस्पिटलचे अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. एस. ए. लाड यांनी दिली. (Spine surgery)

पश्चिम महाराष्ट्रात विविध कारणामुळे विशेषत: शेतकरी आणि कष्टकऱ्यांमध्ये मणका विकाराचे प्रमाण वाढत आहे. अशा गरजवंत रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी १९ एप्रिल रोजी मोफत मणका शस्त्रक्रियाचे आयोजन केले होते. यामध्ये विविध वयोगटातील १०  रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ५ ते १० लाख रुपये खर्च येतो. मात्र, डी. वाय. पाटील हॉस्पिटल व स्पाईन फाऊंडेशनच्यावतीने या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. शनिवारी या उपक्रमांतर्गत १०० वी शस्त्रक्रिया करण्यात आली. (Spine surgery)

स्पाईन फाउंडेशनचे प्रमुख डॉ. शेखर भोजराज म्हणाले,  ‘द स्पाईन फाउंडेशन’च्या वतीने डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये गेल्या पाच वर्षांपासून स्पाईन ओपीडी आणि सर्जरी हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत शंभरावर रुग्णांवर अतिशय गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया आल्याचा आनंद आहे. मणका आजारावरील अत्याधुनिक उपचार डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर एन्डोस्कोपिक स्पाईन सर्जरीही केल्या जातात, गरजवंतांनी याचा लाभ घ्यावा.’

डॉ. एस . ए. लाड म्हणाले, डी.  वाय. पाटील हॉस्पिटल येथे गंभीर आजार असलेल्या १०२ रूग्णावर मणक्याच्या गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. द स्पाईन फाऊंडेशन मुंबई सहकार्याने मोफत स्पाईन सर्जरी करणारे डी. वाय. पाटील हॉस्पिटल हे गडचिरोलीनंतर देशातील दुसरे मोठे सेंटर बनले आहे. (Spine surgery)

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील आणि पृथ्वीराज पाटील, कुलगुरु डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने जास्तीत जास्त रुग्णापर्यंत ही सेवा पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. लाड यांनी सांगितले. दरम्यान, मणक्याची शंभरावी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर डॉक्टर्स व सहकाऱ्यानी केक कापून आनंद साजरा केला. डॉ. शेखर भोजराज, डॉ. तुषार देवरे, डॉ. सलीम लाड यांच्याहस्ते केक कापण्यात आला.
यावेळी अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. हृषीकेश मेहता, डॉ. शैलेश हडगावकर, न्यूरोसर्जन डॉ. उदय घाटे, डॉ. बी. सी. पाटील, डॉ. अमोल गोवईकर, डॉ. उमेश जैन, डॉ. सिद्धार्थ निगडे  यांच्यासह स्पाईन फाऊंडेशनचे डॉक्टर्स,  भूलरोग तज्ञ डॉ. संदीप कदम, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील व सहकारी उपस्थित होते.

हेही वाचा :
इमारत कोसळली; ११ जणांचा मृत्यू
कॅनडातील गोळीबारात भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Related posts

‘मित्र’ आणि बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना : मुख्यमंत्री फडणवीस

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

जैवतंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाभिमुख दृष्टीकोन आवश्यक – डॉ. एस. आर. यादव