सहा फुटीर खासदारांचा अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Six rebel MPs join Shiv Sena

जमीर काझी : मुंबई :  शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून फुटलेल्या सहा खासदारांनी सोमवारी अधिकृतरित्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांना विकास कामासाठी निधीची कमी पडू देणार नाही, अशी हमी दिली. (Six rebel MPs join Shiv Sena)

ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीत गैरहजर राहून बंडखोरी करणारे खासदार ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, नागेश आष्टीकर, व भाऊसाहेब वाकचौरे हे आज प्रथमच एकत्रितपणे माध्यमाच्या समोर आले.

शिंदे गटातील पक्षप्रवेशामुळे तळ्यात मळ्यात करणाऱ्या ओमराजे निंबाळकरसह सहा जणाचा फुटीर खासदारांमुळे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या राजकीय नाट्याला अखेर संपुष्टात आले. आहे. त्यांच्या प्रवेशाची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून पुढच्या निवडणुकीतही त्यांना पक्षातर्फे उमेदवारी दिली जाईल असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

बंडखोर खासदार ठाण्यात दाखल

ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी रात्री शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सोमवारी शिंदे गटाने वेगवान हालचाली केल्या. आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने सर्व मंत्री आमदार मुंबईतच जमलेले आहेत त्यामुळे राजकीय वातावरण तापले असताना सहा फुटीर खासदार आज दुपारी शिंदे यांच्या ठाण्यातील आनंदवन येथील निवासस्थानी आले. याठिकाणी सुमारे दोन तास बैठक झाल्यानंतर सर्वजण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आले. या ठिकाणी त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.

आमच्याकडे ट्रिपल संजय

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटावर जोरदार टीका केली.ते म्हणाले की, ‘ ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय बंडू जाधव, संजय देशमुख आणि नागेश आष्टीकर आहेत. आमच्याकडे ट्रिपल संजय आहेत. तर चौथा संजय राठोड आहे. भरपूर संजय आहेत. त्यामुळे बाकी कुणाबद्दल मी बोलतोय ते सांगायची गरज नाही. (Six rebel MPs join Shiv Sena)

चार वर्षापूर्वी पहिला उठाव

शिवसेना हे कुटुंब असून खऱ्या शिवसेना परिवारात बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेना परिवारात कट्टर शिवसैनिक खासदार सामील झाले आहेत. त्यांचं मी पक्षात स्वागत करतो. चार वर्षापूर्वी २२ जून २०२२ आम्ही उठाव केला होता. तेव्हा ४० आमदार सुरुवातीला आले. त्यानंतर पुन्हा चौकार नाही, षटकार मारलेला आहे. २०२२ मध्ये शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी तो उठाव केला. हा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आपला लढा हा बाळासाहेबांच्या विचाराचा असल्याचे त्यांनी सांगितले.

अष्टीकराच्या पुत्राची ठाकरे गटातून हकालपट्टी

 हिंगोलीचे बंडखोर खासदार नागेश पाटील -अष्टीकर यांचे पुत्र कृष्णा अष्टीकर यांची आज ठाकरे गटातून अकालपट्टी करण्यात आली आहे पक्षाचे नेते खा संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती जाहीर केली कृष्णा आष्टीकर हे हिगोलीतून विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार होते. आज त्यांचा दारुण पराभव झाल्यानंतर त्यांच्या अकालपट्टीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. (Six rebel MPs join Shiv Sena)

Related posts

महात्मा फुले यांच्याबद्दल बालभारती पुस्तकात चुकीची माहिती

कोचिंग क्लासला आग; १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

कन्येच्या वाढदिनी तृतीयपंथीयांचा सन्मान