कोचिंग क्लासला आग; १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Fire at a coaching class in Lucknow

लखनऊ : उत्तरप्रदेशाची राजधानी लखनऊ येथील अलिगंज भागातील एका कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या दुर्घटनेत ३० विद्यार्थी जखमी झाले आहेत. जीव वाचवण्यासाठी पाच ते सहा विद्यार्थ्यांनी उड्या मारल्या. तेही जखमी झाले आहेत. घटनास्थळी मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी भेट दिली. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह शोक व्यक्त केला आहे. (Fire at a coaching class in Lucknow)

लखनऊच्या अलिगंज भागातील उषा मेहता मार्गावरील एका इमारतीला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग वेगाने भडकली. अग्निशमन दलाला वर्दी मिळताच घटनास्थळी हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म वाहनासह चौदा अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यांनी बचाव कार्यास सुरुवात केली.

तळमजल्यावरील पेट क्लिनिकमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि वरच्या मजल्यावर पोहोचली. इमारतीचे छत बंद असल्याने विद्यार्थ्यांना छतावर जाता आले नाही. त्यामुळे मृतांची संख्या वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे. (Fire at a coaching class in Lucknow)

या अपघात किमान १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. केजीएमयू ट्रामा केअर सेंटरचे डॉ. अनिल अग्रवाल यांनी २१ ते २२ मुलांना उपचारास दाखल करण्यात आले. त्यामधील पाच जण गंभीर जखमी होती. जीव वाचवण्यासाठी उड्या मारलेल्या दोघांच्या पाठीला दुखापत झाली आहे. १५ जणांचे मृतदेह आणण्यात आले. उपचारापूर्वी १५ मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. (Fire at a coaching class in Lucknow)

Related posts

महात्मा फुले यांच्याबद्दल बालभारती पुस्तकात चुकीची माहिती

सहा फुटीर खासदारांचा अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश

कन्येच्या वाढदिनी तृतीयपंथीयांचा सन्मान