नवी दिल्ली : महाराष्ट्र वगळून १२ राज्यात विशेष सखोल फेरतपासणी म्हणजेच स्पेशल इन्स्टेसिव्ह रिव्हिजन (एसआयआर) प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दुसऱ्या टप्प्यात देशातील १२ राज्यांमध्ये एआयआर राबवण्याची घोषणा केली आहे. त्यात अंदमान आणि निकोबार बेटे, गोवा, पुद्दुचेरी, छत्तीसगड, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि लक्षद्वीप यांचा समावेश आहे. (SIR in 12 states)
१२ राज्यात ५१ कोटी मतदार
ज्ञानेश कुमार म्हणाले की, एसआयआरचा उद्देश अपात्र मतदारांना काढून टाकणे आणि पात्र मतदारांना सक्षम करणे आहे. त्यामुळे १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मंगळवारपासून विशेष सघन सुधारणा (एसआयआर) सुरू होईल. त्यात अंदमान आणि निकोबार बेटे, गोवा, पुद्दुचेरी, छत्तीसगड, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि लक्षद्वीप यांचा समावेश आहे. तसेच ज्या १२ राज्यांमध्ये विशेष सखोल फेरतपासणी राबविली जाईल तिथे अंदाजे ५१ कोटी मतदार आहेत. राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या सात लाखांहून हून अधिक बीएलओसोबत एकूण ५.३३ लाख बीएओ या प्रक्रियेवर काम करतील. (SIR in 12 states)
अंतिम मतदार यादी २५ फेब्रुवारीला
ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, दुसऱ्या टप्पासाठी छपाई आणि प्रशिक्षण उद्यापासून (२८ ऑक्टोबर) 3 नोव्हेंबरपर्यंत सुरू होईल आणि त्यानंतर चार नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत बीएलओ घरोघरी जाऊन मतमोजणी करतील. त्यानंतर प्रारूप मतदार यादी ८ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल आणि ९ डिसेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. नोटिसा बजावलेल्या मतदार यादीची सुनावणी ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहील आणि अंतिम मतदार यादी ७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाईल. तसेच ज्या राज्यांमध्ये एसआयआर केले जाईल, तिथे आज मध्यरात्रीच मतदार याद्या गोठवल्या जातील आणि तेथील मतदारांना त्यांच्या सर्व तपशीलांसह विशिष्ट मतमोजणी फॉर्म दिले जातील. तसेच दुसऱ्या टप्प्यात बीएलओ मतदारांची माहिती गोळा करण्यासाठी प्रत्येक घराला तीन वेळा भेट देतील. सर्व माहिती मिळवल्यानंतर बीएलओ ती जिल्हा प्रशासनाला सादर करतील. ज्या राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया केली जाणार आहे. (SIR in 12 states)
२१ वर्षापूर्वी शेवटचा एसआयआर
ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, देशातील शेवटचा एसआयआर २१ वर्षांपूर्वी करण्यात आला होता. त्यामुळे आता होणाऱ्या एसआयआरमधून सर्व पात्र मतदारांना एसआयआरमध्ये समाविष्ट केले जाईल आणि अपात्र मतदारांना यादीतून काढून टाकले जाईल. कारण या संदर्भात अनेक बैठका झाल्या, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. बनावट मतदारांना आळा घालण्यासाठी निवडणुकीपूर्वी एसआयआर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राबाबत घोषणा नाही
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत मोठा घोळ झाला आहे असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी, राज्यातील महाविकास आघाडी, मनसे या पक्षांनी केली असताना एसआयआरबाबत महाराष्ट्राबाबत कोणतीच घोषणा केलेली नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक घोळ असलेल्या मतदारयादीवर घेतली जाणार आहे. एक नोव्हेंबरला मुंबईत विरोधी पक्षाकडून निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाही काढण्यात येणार आहे. (SIR in 12 states)